Tuesday, September 15, 2026
ENTERTAINMENTLatest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

Dr. Amol Kolhe : कोणती भूमिका साकारायची हा शेवटी त्यांचा प्रश्न आहे – नाना पाटेकर


पुणे: अभिनेता, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, खासदार अमोल कोल्हे हे सध्या ‘Why I Killed Gandhi’ या चित्रपटामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. या चित्रपटात अमोल कोल्हे यांनी नथुराम गोडसे यांची भूमिका साकारली आहे. खासदार डॉ.अमोल कोल्हे हे अभिनेते आहेत कोणती भूमिका साकारायची शेवटी त्यांचा प्रश्न आहे. असे बोलून अभिनेते नाना पाटेकर यांनी खासदार अमोल कोल्हे यांचे समर्थन केले आहे.

नाना पाटेकर यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे कोविड गाव मुक्त अभियान च्या कार्यक्रमाला हजेरी लावली तेव्हा त्यांनी माध्यमांशी संवाद साधला. तेव्हा ते बोलत होते. नाना पाटेकर म्हणाले,कोविड गाव मुक्त अभियान हा कार्यक्रम सरकार मस्त राबवत आहे. लवकरात लवकर गाव कोविड  मुक्त होतील तशी आपल्याला पहिल्यासारखे आयुष्य जगता येईल. मी स्वतःहा जसे स्वच्छ गाव ही संकल्पना करण्याचा उपक्रम राबवला आहे. तसे प्रत्येकाने मनात ही संकल्पना राबवून हा उपक्रम राबविला पाहिजे .असे नाना पाटेकर म्हणाले.
महानगरपालिकेच्या निवडणुका जवळ येऊ लागल्या आहेत ,त्यावर नाना पाटेकर म्हणाले, महानगरपालिका निवडणूक म्हटल की विरोधी पक्ष व सत्ताधारी पक्षात हाणामारी होणारच. उमेदवार हा पदवीधर पाहिजे व प्रत्येक पक्षाने पदवीधर उमेदवार आपला निवडणुकीत दिला पाहिजे .असे नाना पाटेकर म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading