Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

त्सुनामीग्रस्त किंगडम ऑफ टोंगाला मदतीचे आवाहन

पुणे : साऊथ पॅसिफिक देश असलेल्या किंगडम ऑफ टोंगाला या आठवड्यात ज्वालामुखी आणि त्सुनामीने उध्वस्त केले असून या देशाच्या मदतीसाठी ऑलिम्पिकपटू तसेच युनिसेफचे सदिच्छादूत पिटा तौफाटोहुआ यांनी मदत मोहीम हाती घेतली आहे. या मदत मोहिमेत पुणेकरांनी योगदान द्यावे,असे आवाहन टोंगाच्या कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक सदस्य प्रा.राकेश मित्तल यांनी पत्रकाद्वारे केले आहे.

ऑलिम्पिकपटू आणि युनिसेफ दूत पिटा तौफाटोहुआ यांनी gofund.me/c732d878 या संकेतस्थळाद्वारे मदत पाठवावी,असे आवाहन केले आहे.ज्वालामुखी पाठोपाठ आलेल्या त्सुनामीने टोंगामधील दळणवळण यंत्रणा, संदेश वहन यंत्रणा बंद पडली आहे. मोठे नुकसान झाले आहे.टोंगा देश पुन्हा उभा होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मदतीची आवश्यकता आहे.

भारत आणि किंग्डम ऑफ टोंगा देशाचे संबंध चांगले असून माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी 1981 साली या देशाला भेट दिली होती. टोंगाचे राजे टॉपोऊ-(चतुर्थ ) हे देखील 1971 आणि 1976 साली भारत भेटीवर आले होते. त्या देशातील देशाच्या राजघराण्यातील अनेक सदस्यांनी भारतात मिलिटरी सैन्य प्रशिक्षण घेतले आहे. टोंगामधील अनेक विद्यार्थी भारतात शिक्षणासाठी आलेले आहेत.प्रा.राकेश मित्तल हे टोंगामधील कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटीचे संस्थापक सदस्य आहेत आणि सात वेळा यानिमित्ताने टोंगाला जाऊन आलेले आहेत. कॉमनवेल्थ व्होकेशनल युनिव्हर्सिटी देखील भारतातून या ज्वालामुखीग्रस्त आणि त्सुनामीग्रस्त देशाला मदत करण्यासाठी ऑलिंपिकपटु पिटा तौफाटोहुआ यांच्या मदत अभियानात सहभागी झाली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading