टेक्नोकडून ११ जीबीपर्यंत रॅम आणि ६००० एमएएच बॅटरी असलेला स्मार्टफोन ‘पोवा निओ’ लाँच
टेक्नो या जागतिक प्रिमिअम स्मार्टफोन ब्रॅण्डने आज त्यांच्या कार्यक्षमता-केंद्रित पोवा सिरीजमधील नवीन स्मार्टफोन पोवा निओ लॉंच केला. पोवा सिरीजमधील स्मार्टफोन्स ग्राहकांना किफायतशीर दरांमध्ये अद्वितीय क्षमता व गती देण्यासाठी ओळखले जातात. डिजिटल युगातील जनरेशन झेड ग्राहक स्मार्टफोनवर अनेक अॅप्लीकेशन्सचा वापर करत मोठ्या प्रमाणात डेटा निर्माण करतात. ते नेहमीच प्रबळ कार्यक्षमता व व्यापक मेमरी देणा-या स्मार्टफोनचा शोध घेत असतात. ग्राहकांच्या अशा गरजांची पूर्तता करत नवीन लॉंच करण्यात आलेल्या पोवा निओमध्ये उल्लेखनीय वैशिष्ट्ये व ६ जीबी रॅम आहे, जी ११ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. तसेच या स्मार्टफोनमध्ये मेमरी फ्यूजन तंत्रज्ञान, १२८ जीबी स्टोरेज आणि विशाल ६००० एमएएच बॅटरी, १८ वॅट फास्ट चार्जिंग, आकर्षक ६.८ इंच डिस्प्ले आणि आकर्षक डिझाइन आहे.
पोवा निओमध्ये १३ मेगापिक्सल एआय ड्युअल रिअर कॅमेरासह क्वॉड फ्लॅशलाइट आणि ८ मेगापिक्सल कॅमेरासह ड्युअल फ्लॅशलाइट आहे, ज्यामधून कोणत्याही प्रकाशामध्ये सुस्पष्ट फोटोज व व्हिडिओ कॅप्चर होण्याची खात्री मिळते. उत्साही भावी पिढीच्या सर्व फोटोग्राफी गरजांची पूर्तता होते.
ड्युअल सुरक्षितता वैशिष्ट्ये असलेल्या पोवा निओमध्ये रिअर फिंगरप्रिंट स्कॅनर व फेस लॉक आहे. हा स्मार्टफोन पोवेही ब्लॅक, गीक ब्लॅक व ऑब्सिडियन ब्लॅक रंगांमध्ये उपलब्ध असेल. स्मार्टफोनची किंमत १२,९९९ रूपयांपासून सुरू होते आणि १४९९ रूपयांच्या टेक्नो इअरबड्सच्या कॉम्प्लीमेण्टरी जोडीसह येतो. हा स्मार्टफोन २२ जानेवारी २०२२ पासून रिटेल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल.
टेक्नो पोवा निओची ठळक वैशिष्ट्ये
अधिक स्टोरेज क्षमता, सर्वोत्तम कार्यक्षमता
पोवा निओमध्ये शक्तिशाली ६ जीबी उच्च क्षमतेची एलपीडीडीआर४एक्स रॅम + ५ जीबीपर्यंत विस्तारित करण्यात येणा-या रॅमसह सुपर-फास्ट कार्यक्षमतेसाठी मेमरी फ्यूजन तंत्रज्ञान, विशाल १२८ जीबी ईएमएमसी ५.१ इंटर्नल स्टोरेज क्षमता आहे, जी समर्पित एसडी कार्ड स्लॉटच्या माध्यमातून जवळपास ५१२ जीबीपर्यंत वाढवता येऊ शकते. एकसंधी स्मार्टफोन अनुभव देण्यासाठी हा स्मार्टफोन अँड्रॉईड ११ वर आधारित एचआयओएसव्ही७.६ वर संचालित आहे.
दीर्घकाळापर्यंत टिकणारी ६००० एमएएच क्षमतेची शक्तिशाली बॅटरी
पोवा निओमध्ये अद्वितीय ६००० एमएएच क्षमतेची बॅटरी आहे, जी एकाच चार्जमध्ये दीर्घकाळापर्यंत विनाव्यत्यय स्मार्टफोन वापराचा अनुभव देते. ही विशाल बॅटरी व्यापक ५५ दिवसांचा स्टॅण्डबाय टाइम, १९० तासांचे म्युझिक प्लेबॅक आणि ४३ तासांचे कॉलिंग टाइम देते. यामधील इन-बॉक्स १८ वॅट फ्लॅश चार्जर फोनला एका तासाच्या आत ५० टक्क्यांपर्यंत चार्ज करतो. यामधील अल्ट्रा सेव्हिंग मोड प्रखर पॉवर बॅक अपसाठी परिपूर्ण आहे.
उच्च दर्जाच्या व्युईंगसाठी अविश्वसनीय ६.८ इंच एचडी+ डॉट-नॉच डिस्प्लेसह स्प्लॅश रेसिस्टण्ट टेक्नोलॉजी
पोवा निओमध्ये ६.८ इंच एचडी+ विशाल डॉट नॉच डिस्प्लेसह ८९.४२ टक्के स्क्रीन-टू-बॉडी रेशिओ आहे, ज्यामुळे मनसोक्त मनोरंजनासाठी हा स्मार्टफोन अगदी परिपूर्ण आहे. २६२ पीपीआय पिक्सल डेन्सिटी व ४८० नीट्स ब्राइटनेस स्क्रिनला गेम्स खेळण्यासाठी, व्हिडिओज पाहण्यासाठी किंवा ई-लर्निंग, मीटिंग्ज इत्यादी सारख्या ऑनलाइन कृती करण्यासाठी परिपूर्ण बनवतात. १२० हर्टझ टच सॅम्प्लिंग रेट प्रो ग्रेड गेमिंगसाठी सुलभ टच अनुभव देतो. यामध्ये आयपीएक्स२ रेटिंगपर्यंतचे स्प्लॅश रेसिस्टण्ट देखील आहे, जे स्मार्टफोनचे पाण्यापासून होणा-या नुकसानापासून संरक्षण करते. यामधील आधुनिक व आकर्षक डिझाइनसह डीटीएस साऊंड एन्हान्समेंट प्रत्येक वेळी उच्च दर्जाचा मधुरमय साऊंडचा अनुभव देते आणि या स्मार्टफोनचे लुक अत्यंत लक्झरीअस आहे.
१३ मेगापिक्सल ड्युअल रिअर कॅमेरा आणि एआय-सक्षम फोटोग्राफीसह सुस्पष्ट व आकर्षक फोटो मिळण्याची खात्री
पोवा निओमध्ये ड्युअल रिअर कॅमेरा सेटअप आहे, ज्यामध्ये १३ मेगापिक्सल रिअर कॅमेरा व एआय लेन्स (एफ२.० अर्पेचर) आहे, ज्यामधून प्रत्येक पिक्सलमध्ये अधिक सुस्पष्टतेसह हाय-रिझॉल्युशन फोटोज कॅप्चर होण्याची खात्री मिळते. हा कॅमेरा कोणत्याही बारीक-सारीक गोष्टी न चुकवता संस्मरणीय फोटोज कॅप्चर करू शकतो. यामध्ये प्रो-शूटिंग अनुभवासाठी स्लो मोशन व १०८०पी टाइम-लॅप्स आहे.
ईटी इंजिन ऑप्टिमायझेशनसह सुलभ गेमिंग अनुभव
पोवा निओमध्ये कार्यक्षम मीडियाटेक हेलिओ जी२५ प्रोसेसर व ईटी इंजिन ऑप्टिमायझेशन आहे, ज्यांची गती जवळपास २.० गिगाहर्टझ आहे. यामधून युजर्सना सीपीयूचे लक्ष्य अॅक्सलरेशन, कमी जीपीयू कम्प्युटिंग प्रेशर आणि नेटवर्कमधील गेम पॅकेट्सच्या अॅक्सलरेटेड प्रोसेसिंगसह सुलभ व फुल-फ्रेम गेमिंग अनुभव मिळतो.
युजर्सना एचआयेएस ७.६ सह अनेक अद्वितीय व सानुकूल वैशिष्ट्यांचा अनुभव मिळतो. यामध्ये वॉल्ट २.०, स्मार्ट पॅनेल २.०, किड्स मोड, सोशल टूर्बो (डब्ल्यूए अनुभव सुधारण्यासाठी), अॅण्टी–थेफ्ट अलार्म, वॉईस चेंजर, अॅप ट्विन, पीक प्रूफ, अल्ट्रा बॅटरी सेव्हर, फोटो कम्प्रेसर, व्हिडिओ असिस्टण्ट, गेम स्पेस अशी इतर अनेक वैशिष्ट्ये आहेत.
