Thursday, June 18, 2026
Latest NewsPUNETOP NEWS

नाना पटोले यांना येरवड्याच्या मनोरुग्णालयात उपचारासाठी दाखल करावे भाजपची मागणी

पुणे: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी  देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विषयी आक्षेपार्ह भाषा व मारण्याची धमकी देणारे भाष्य केले होते त्याचा निषेध कालपासून भाजप अख्या राज्यात करत आहे. आज नाना पाटोले यांना येरवडा येथील मनोरुग्णालयात अत्यंत गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्वरित दाखल करून घेण्यात यावे यासाठी पुणे शहर भारतीय जनता युवा मोर्चातर्फे भाजपा शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले.

या आंदोलनाच्या वेळी नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा कडून निषेध व्यक्त करण्यात आला. हे आंदोलन भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वात करण्यात आले. या आंदोलनाला भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक धीरज घाटे, गणेश घोस, अभिजित पवार ,आदित्य जागडे, शंतनू जागडे व भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

जगदीश मुळीक म्हणाले, काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मोदी जी बद्दल भाष्य केले आहे.ते एकदम चुकीचे आहे. पंतप्रधान बद्दल भाष्य करताना त्यांनी व्यवस्थित भाष्य केले पाहिजे. नाना पटोले हे पुण्यात आल्यावर आम्ही त्यांचे वेगळे पद्धतीने स्वागत करणार आहोत. नाना पटोले यांनी केलेल्या वक्तव्याचा निषेध आम्ही या आंदोलनातून करत आहोत.व त्याना येरवडा येथील मनोरुग्णालयात अत्यंत गंभीर आजाराच्या उपचारासाठी त्वरित दाखल करून घेण्यात यावे यासाठी आम्ही येरवडा येथील मेंटल हॉस्पिटल ला निवेदन देत आहोत .असे जगदीश मुळीक म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading