Sunday, June 21, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNE

ज्येष्ठ समाजवादी नेत्या पुष्पा मायदेव यांचे निधन

पुणे : ज्येष्ठ समाजवादी नेत्या आणि समाजवादी महिला सभेच्या अध्यक्षा पुष्पा मायदेव यांचं आज दुपारी वृद्धापकाळानं निधन झालं. त्या 90 वर्षाच्या होत्या. आज संध्याकाळी पुण्यातील नवी पेठ वैकुंठभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. .प्रा.अंजलीताई आंबेडकर यांच्या त्या मातोश्री व वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांच्या त्या सासू होत्या.त्यांच्या पश्यात दोन मुली, नातवंडे, सून असा परिवार आहे.

ज्येष्ठ समाजवादी नेते भाई वैद्य यांचे चिरंजीव आणि समाजवादी चळवळीशी जवळून निगडीत असलेले डाॅ.अभिजीत वैद्य यावेळी त्यांच्या शोकसंदेशात म्हणाले, पुष्पाताई मायदेवांच्या निधनाने समाजवादी महिला नेत्यांच्या दैदिप्यमान साखळीतील शेवटच्या ज्या काही कड्या शिल्लक आहेत त्यातली एक कडी आज निखळून पडली. आणि फार मोठा समाजवादी महिला चळवळीच्या इतिहासाचे एक पान काळाच्या आड गेलं आहे.पुष्पाताईंचे राष्ट्रसेवा दल, समाजवादी पक्ष आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे समाजवादी महिला सभेच्या माध्यमातून त्यांनी दिलेलं योगदान हे अपूर्व असं योगदान आहे. ज्या निष्ठेनं त्यांनी आयुष्यभर त्या समाजवादी विचार आणि समाजवादी विचाराच्या आधारे संपूर्ण महिला चळवळींना जो एक आधार देत राहिल्या तो अभुतपुर्व असा होता. त्यांच्या जाण्याने संपूर्ण समाजवादी महिला चळवळीचीच नाही तर एकुणच समाजवादी चळवळीची फार मोठी हानी झालेली आहे. वैद्य कुटुंबिय, आरोग्य सेना आणि मायदेव कुटुंबिय यांच्यात अनेक वर्षांचे ऋणानुबंध होते त्यामुळे पुष्पा मायदेव यांचं निधन ही समजावादी चळवळीसोबतच व्यक्तिगत पातळीवर देखील फार मोठी हानी झालेली आहे.

या वेळी वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर, राष्ट्रीय सेवा दलाचे राष्ट्रीय महासचिव अतुल देशमुख, समाजवादी महिला सभेच्या विश्वस्त वर्षाताई गुप्ते, राकेश नेवासकर, भारिप बहुजन महासंघाचे प्रदेशअध्यक्ष अशोकभाऊ सोनोने, सत्यशोधक कष्टकरी सभेचे कॉ. किशोर ढमाले, प्रा. प्रतिमा परदेशी यांच्यासह अनेक मान्यवर यावेळी उपस्थित होते.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading