सिद्धूचं पाऊल किचनमध्ये कसं पेलवणार तांबडा पांढरा रस्सा बनवायचं आव्हान?

झी मराठीवर नुकतंच प्रेक्षकांच्या भेटीस आलेल्या किचन कल्लाकार या कार्यक्रमाला प्रेक्षकांची पसंती मिळतेय. किचन आणि कलाकार हे समीकरण जुळलेलं नसताना पाककलेच्या कसोटीला उतरलेल्या कलाकारांची उडणारी तारांबळ बघताना प्रेक्षकांना खूप मजा येतेय. एनर्जीचं पावर हाऊस म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ जाधव हा एक अष्टपैलू कलाकार आहे पण आता तो किचन कल्लाकारच्या मंचावर येऊन आपली पाककला दाखवण्याचं शिवधनुष्य पेलवू शकेल कि नाही हे प्रेक्षकांना आगामी भागात पाहायला मिळेल.

सिद्धार्थला महाराज तांबडा पांढरा रस्सा बनवण्याचं आव्हान देणार आहेत. त्यावर सिद्धू आश्चर्यचकित होऊन आता काय करू आणि काय नको अशी प्रतिक्रिया देतो. आता सिद्धूला किचनमध्ये तांबडा पांढरा रस्सा बनवायला जमेल कि महाराजांना एखादा वेगळाच पदार्थ खायला मिळेल हे पाहणं औस्त्युक्याच ठरेल. इतकंच नव्हे तर या आठवड्यात किचन कल्लाकार या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनाची धुरा श्रेया बुगडे सांभाळणार आहे. सिद्धू सोबत या आठवड्यात सुयश टिळक, सायली संजीव, मृण्मयी देशपांडे, कार्तिकी गायकवाड आणि भाऊ कदम हे कलाकार या मंचावर सज्ज होणार आहेत. त्यामुळे पाहायला विसरू नका किचन कल्लाकार या कार्यक्रमाचा आगामी भाग १९ आणि २० जानेवारी रोजी रात्री ९.३० वाजता फक्त आपल्या झी मराठीवर

Leave a Reply

%d bloggers like this: