fbpx
Saturday, April 27, 2024
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचा प्रयत्न भाजपा रोखणार

मुंबई : छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांवर विशिष्ट धर्माची स्थाने उभारण्याचे प्रकार गेल्या दोन वर्षात चालू झाले आहेत. शिवसेनेने तर सत्तेसाठी हिंदुत्व सोडले असून गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याकडे त्यांचे दुर्लक्ष झाले आहे. गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्याचे हे प्रयत्न रोखण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची दक्षता समिती स्थापन करत असल्याची घोषणा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी मंगळवारी केली.

चंद्रकांत पाटील म्हणाले की,  छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे हिरवेकरण करण्याचा निंदनीय प्रयत्न सुरू आहेत. काही दिवसांपूर्वी किल्ले रायगड येथे मदार मोर्चा येथे रंगरंगोटी करून व चादर चढवून त्याचे प्रार्थनास्थळ करण्याचा प्रयत्न केल्याचे उघड झाले. त्याच्या विरोधात छत्रपती खा. संभाजीराजे यांनी पुरातत्व खात्याकडे पत्र पाठवून कारवाईची मागणी केली. विशेष म्हणजे स्थानिक शिवसेना आमदारांनी या विषयाकडे दुर्लक्ष केले पण संभाजीराजेंनी आवाज उठवला. ठिकठिकाणी असे प्रकार घडत आहेत.  या प्रकारांच्या विरोधात पोलिसांकडे तक्रारी केल्या की पोलीस ऐतिहासिक पुरावा मागतात आणि तक्रार घेत नाहीत. ऐतिहासिक बाबींचे सरसकट कागदोपत्री पुरावे मिळू शकत नाहीत याचा फायदा घेऊन महाविकास आघाडी सरकारच्या आशिर्वादाने व पोलिसांच्या मदतीने गडकिल्ल्यांचे पावित्र्य नष्ट करण्यात येत आहे.

ते म्हणाले की, गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाच्या वतीने आपण पदाधिकाऱ्यांची एक दक्षता समिती स्थापन करत आहोत. ही समिती गडांना भेट देऊन गेल्या दोन वर्षात गडाचे पावित्र्य भंग करण्याचे कोणकोणते प्रयत्न झाले आहेत याची नोंद करेल आणि नंतर संपूर्ण पक्ष जनजागृती करून गडांचे पावित्र्य जपण्यासाठी संघर्ष करेल. भाजपा खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे यांच्या नेतृत्वाखालील एका शिष्टमंडळाने केंद्र सरकराच्या पुरातत्व खात्याकडे निवेदन देऊन नुकतेच या प्रश्नाकडे लक्ष वेधले आहे. केंद्र सरकार कारवाई करेलच पण पक्ष म्हणून भाजपाही या विषयावर पाठपुरावा करेल.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांचे पावित्र्य जपण्यासाठी भाजपाची प्रदेश दक्षता समिती खालीलप्रमाणे –
अध्यक्ष – खासदार रणजितसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर, माढा
सदस्य – खासदार डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
माजी आमदार नितीनराजे शिंदे, सांगली
भाजपा सातारा जिल्हाध्यक्ष विक्रम पावसकर
भाजपा प्रदेश महिला मोर्चा चिटणीस वर्षा डहाळे
समितीचे मार्गदर्शक भाजपा राष्ट्रीय सचिव सुनिल देवधर असतील.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading