Saturday, October 31, 2026
Latest NewsMAHARASHTRA

15 दिवसांनी कोरोना परिस्थितीचा आढाव घेवून शाळांबाबत निर्णय होईल – आरोग्यमंत्री 

मुंबई : कोरोना रुग्ण संख्येचा वाढता आलेख व ओमिक्रॉनची धास्ती यामुळे राज्यातील शाळा 15 फेब्रुवारीपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र जवळपास दोन वर्ष शाळा बंद असल्याने मुलांच्या शारीरीक व मानसिक आरोग्यावर परिणाम होत आहे. त्यामुळे अनेक स्तरातून शाळा बंद ठेवण्याच्या सरकारच्या निर्णयावर टीका होत आहे. त्यामुळे पुढील काळात शाळा कधी सुरू करायच्या याबाबत 15 दिवसांनी कोरोना परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली आहे.

राजेश टोपे म्हणाले, लहान मुलांचे कोरोना बाधित होण्याचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे शिक्षण तज्ञांनी व अनेक संस्थांनी शाळा सुरू करण्याची मागणी केली आहे. याबाबत कॅबिनेट मध्येही चर्चा झाली आहे. त्यामुळे पुढील 15 दिवसांचा गॅप घेवून त्यानंतर राज्यातील कोरोना परिस्थितीचा आढावा घेवून शाळा सुरू करण्याबाबद निर्णय घेतला जाईल.

 

Leave a Reply