मकरसंक्रांतीनिमित्त आपुलकीचा सन्मान..!

पुणे : १९७१ च्या युद्धामध्ये भारताने पाकिस्तानचा दणदणीत पराभव केला. त्यामध्ये पाकिस्तान मधील बसंतर युद्धाचा आवर्जून उल्लेख होतो व केलाही पाहिजे. नऊ इंजिनियर्स या रेजिमेंटमध्ये कर्नल असलेले बी. टि. पंडित व त्यांच्या सोबतच्या सैनिकांनी जो अतुलनीय अभूतपूर्व पराक्रम गाजवून पाकिस्तानचे ६० रणगाडे उध्वस्त केले व या कामगिरीने खऱ्या अर्थाने पाकिस्तानचे कंबरडे मोडले. बी. टी. पंडित ह्यांच्या जीप वर पाकिस्तानकडून हल्ला जो झाला, त्यावेळी त्यांचे तीन सहकारी सैनिकांना वीरमरण प्राप्त झाले. तरीही अभूतपूर्व साहस व धाडस दाखवत पाकिस्तानचे माईन्स नेस्तनाबूत करत त्यांनी संपूर्ण रेजिमेंटवर विजय मिळवला.

पुण्यातील चार गणपती मंडळांनी भोगी व मकरसंक्रांतीचे औचित्य साधून त्यांच्या घरी जाऊन पंडित सर यांचा सन्मान केला. आपुलकीचे तिळगुळ, गुळपोळी, तिरंगी उपरणं, हलव्याचा हार, बदाम आणि छत्रपती शिवाजी महाराजांची तस्वीर देऊन त्यांचा व त्यांच्या सौभाग्यवती सौ. पुष्पा पंडित यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

साईनाथ मंडळ ट्रस्ट, बुधवार पेठ याचे अध्यक्ष पीयूष शहा, अखिल कापडगंज मित्र मंडळ, रविवार पेठ याचे हरीश खंडेलवाल, महाराष्ट्र तरुण मंडळ, सिटी पोस्ट याचे अध्यक्ष पृथ्वीराज येळवंडे, एकता मित्र मंडळ (ट्रस्ट), अरण्येश्वर सहकारनगर याचे सुधीर ढमाले व विनायक इंगवले या कार्यकर्त्यांनी सदर कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

गणपती मंडळ कार्यकर्त्यांचेही त्यांनी विशेष कौतुक केले. ते म्हणाले, “आम्ही लढू शकलो ते म्हणजे आमचं कुटुंब आमच्या पाठीमागे भक्कम पणे उभे होते, त्यांचा मानसिक आधार होता. आम्ही सैनिक सरहद वर सेवा देत असतो आणि आपण गणपती मंडळाचे कार्यकर्ते समाजाची सेवा करत असता ती ही देशसेवाच आहे, असे उदगार भारावलेले श्री व सौ पंडित सर यांनी सत्कारानंतर काढले.

त्याचसोबत पंडित यांचा मुलगा ही Armed फोर्स Navy मध्ये व्हॉइस अडमिरल पदी रुजू असून आपली सेवा देत आहे व त्यांचे जावई भारतीय वायुसेनामध्ये अधिकारी पदावर सेवा देत आहेत. गणेश मंडळ कार्यकर्त्यांना पंडित सर यांनी वेळ दिला, आपुलकीचा सन्मान स्वीकारला त्याप्रती कृतज्ञता व्यक्त केली व आभार मानले.

Leave a Reply

%d bloggers like this: