Thursday, November 5, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाची शक्यता

पुणे : महाराष्ट्रात थंडीची लाट असून अनेक ठिकाणी दाट धुके देखील पडत असल्याचे चित्र आहे. अशातच येत्या दोन दिवसात पूर्व आणि लगतच्या मध्य भारतात पावसाची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. तसेच पुढील चार ते पाच दिवस उत्तर भारतात खूप दाट धुके पसरणार आहे. 16 आणि 17 जानेवारीला उत्तर-पश्चिम हिमालय तर 18 ते 20 जानेवारी दरम्यान उत्तर पश्चिम भारतातील भागावर याचा परिणाम होणार असल्याची माहिती हवामान विभागाने दिली आहे. तर उद्या महाराष्ट्रातील विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

सध्या वातावरणात होत असलेल्या बदलामुळे हवामान विभागाने काही राज्यांमध्ये पावासाची शक्यता वर्तवली आहे. पावसाची शक्यता असलेल्या राज्यांमध्ये बिहार, झारखंड, ओडिसा, पश्चिम बंगाल, सिक्किम, तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या भागामध्ये हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. तर आज महाराष्ट्रातील विदर्भात हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.  पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्याचबरोबर 14 आणि 15 जानेवारीला म्हणजे आज आणि उद्या अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरा या ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.

Leave a Reply