राजमाता जिजाऊ जन्मोत्सवा निमित्त संभाजी ब्रिगेड च्यावतीने मुलांना फळ व खाऊ वाटप
पुणे : राष्ट्रमाता राजमाता जिजाऊ मॉंसाहेब यांच्या जयंतीनिमित्त वढू बुद्रुक व आव्हाळवाडी येथील माहेर संस्था ( अनाथालय ) येथे संभाजी ब्रिगेडच्या वतीने फळ व मुलांना खाऊ वाटप करण्यात आले. तसेच माहेर संस्था ( अनाथालयात ) राजमाता जिजाऊ मॉंसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेचे पुजन करण्यात आले संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे व इंजि. मनोजकुमार गायकवाड यांनी दीपप्रज्वलन करून व राजमाता जिजाऊ व स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून कार्यक्रमाला सुरवात केली. माहेर संस्थेतील मुलांनी मनोगत वेक्त केले.
यावेळी संभाजी ब्रिगेड जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, इंजि. मनोजकुमार गायकवाड यांनी बोलताना माहेर संस्थेच्या कामाचे कौतुक केले, व अनाथांना आधार देत असल्या बद्दल संस्थेचे आभार मानुन संभाजी ब्रिगेड च्या वतीने नेहमी मदत करण्यात येईल अशी ग्वाही दिली.
माहेर संस्थेचे भुजबळ साहेब यांनी संभाजी ब्रिगेडच्या कामाचे कौतुक केले संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे व पदाधिकारी वायफळ खर्च टाळून प्रत्येक महापुरुषांची जयंती व संभाजी ब्रिगेड च्या नेत्यांचे व स्वतःचे वाढदिवसाच्या निमित्ताने माहेर संस्था ( अनाथालय ) येथे फळवाटप व लहान मुलांना खाऊ वाटप करण्यात येतो, असे मत भुजबळ साहेब यांनी वेक्त केले.
कार्यक्रमाला संभाजी ब्रिगेड चे पुणे जिल्हाध्यक्ष चंद्रशेखर घाडगे, शिवसेना विभाग प्रमुख कौस्तुभ होळकर, जिल्हा सचिव निलेश ढगे, विद्यार्थी आघाडी जिल्हाध्यक्ष जयदीप रणदिवे, जिल्हा कार्याध्यक्ष साजिद सय्यद,इंजि. मनोजकुमार गायकवाड,मावळ लोकसभा अध्यक्ष राजेश गुंड, हवेली तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, शिरूर लोकसभा अध्यक्ष सुनील वाडेकर, विजय कदम, विठ्ठल सुर्यवंशी, बाळासाहेब देशमुख यांच्यासह आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
