Tuesday, September 15, 2026
Latest NewsPUNE

विद्यांचल हायस्कूलचे ऑन लाईन स्नेहसंमेलन उत्साहात साजरे

पुणे : अभिनव शिक्षण प्रसारक मंडळाचे विद्यांचल हायस्कूल या वर्षी २५ व्या वर्षात पर्दापण करत आहे. शिक्षण सेवेत अविरत कार्यरत असणा-या या शाळेत दिनांक २२ व २३ डिसेंबर रोजी ऑन लाईन पद्धतीने स्नेह संमेलन साजरे करण्यात आले.

नर्सरी ते दहावीच्या वर्गातील विद्यार्थ्यांनी यात सहभाग घेतला. या वर्षी ‘विनोद’ हा विषय निवडला होता.

पूर्व प्राथमिक व इयत्ता १ ली व २ री साठी श्रीलंका मॅजिक सोसायटीच्या सदस्या जादूगार धनश्री यांच्यातर्फे मॅजिक शो इयत्ता ३ री ४ थी साठी एस एन. डी. टीच्या गोल्ड मॅडलिस्ट वैदही अष्टपुत्रे यांचे पपेट शो इयत्ता ५ वी व ६वी साठी संगीत कविता आणि कथा यांच्या माध्यमातून आपल्या प्रेक्षकांच्या मनाला अमृतानुभव देणारे तसेच जॅकरडा थेटरचे प्रतिनिधी असलेले श्री वर्धन देशपांडे यांचे कथाकथन व ८वी, ९वी साठी वेगवेगळ्या पदधतीच्या खेळांच्या कार्यशाळेचे आयोजन करण्याचा १० वर्षांचा अनुभव असलेले मनिष फीमॅन यांनी गेम-ओ-थॉन कार्यक्रमाचे आयोजन केले १०वीच्या विदयार्थ्यासाठी मात्र शाळेतच मनिष फीमॅन यांनी गेम-ओ-थॉन कार्यक्रमाचे आयोजन केले.

सर्व विदयार्थानी कार्यक्रमांना चांगली उपस्थिती देऊन व आवडीनी सहभाग घेऊन कार्य कमाची शोभा वाढवली.

संस्थेचे चेअरमन अशोक मुरकुटे, माजी नगरसेविका रंजना मुरकुटे, कार्यकारणी सदस्य भालचंद्र मुरकुटे, श्वेता मुरकुटे व योगिता बहिरट तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका मनिषा कुलकर्णी मॅम यांच्या मार्गदर्शनाखाली स्नेह संमेलन उत्तमरित्या पडले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading