Friday, May 29, 2026
ENTERTAINMENTLatest NewsUncategorized

हेअर स्टायलिस्ट जावेद हबिबचा किळसवाणा प्रकार; केस कापताना पाण्याऐवजी वापरली थुंकी; व्हिडीओ व्हायरल 

मुंबई : आंतरराष्ट्रीय स्तरावर नावाजलेले व सिने कलाकारांचे आवडते हेअर स्टायलिस्ट जावेद हबिब यांचा एक किळस आणणारा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. याध्ये जावेद हबिब एका महिलेचे केस कापत असताना पाणी नसेल तर तुमच्या थुंकीचा वापर करा असे सांगत त्या महिलेल्या केसात चक्क थुंकताना दिसत आहेत. या व्हीडिओमुळे सर्वच सत्रातून जावेद हबिब यांच्यावर टीका होत आहे. जावेद हबीबचा हा व्हिडीओ मुजफ्फरनगर येथील एका कार्यशाळेतील आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कोणत्याही ठिकाणी थुंकणे हे बेकायदेशीर आहे. मात्र याचा जावेद हबिब यांना पूर्णपणे विसर पडलेला दिसत आहे. दरम्यान, जावेद हबिब ज्या महिलेचे केस कापत होते त्या महिलेला देखील हा प्रकार आवडला नसून या महिलेने आपली प्रतिक्रिया सोशल मिडियावर शेयर केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading