पुण्यातील सीएनजी पंप 6 ते 11 जानेवारी दरम्यान बंद राहणार
पुणे : येत्या 6 जानेवारी ते 11 जानेवारी पुण्यातील सीएनजी पंप बंद राहणार आहेत. पुणे शहरात एमजीएनलच्या मुख्य सप्लाय लाईनच्या दुरूस्तीचे काम सुरु आहेत. यासोबत इतरही दुरुस्तीची कामे सुरु आहेत. त्यामुळे पुढील पाच दिवस सीएनजी पंप बंद राहणार आहेेत.
पुण्यात सध्या मोठ्या प्रमाणात वाहने सीएनजीवरील आहेत. त्यामुळे पुणेकरांची पुढील पाच दिवस गैरसोय होणार आहे. त्याचबरोबर महापालिकेने सीएनजीवरील पीएमपीएल बसेशी आणलेल्या आहेत. त्यामुळे पीएमपीेएल वाहतुकीवरही याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
दरम्यान, एमजीएनएल आणि इतर दुरुस्तीची कामे झाल्यास पुन्हा सीएनजी पंप सुरु करण्यात येणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन महानगरपालिकेकडून करण्यात आले आहे.
