तूर्तास तरी राज्यात लॉकडाऊनचा विचार नाही – राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे
मुंबई : राज्यात गेल्या काही दिवसांपासून कोरोना बाधितांची संख्या वाढत आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकार कडून अनेक ठिकाणी कठोर निर्बंध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे तूर्तास तरी राज्यात लॉकडाऊन करण्याचा विचार नाही, अशी माहिती राज्य आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज बैठक झाली. या बैठकी नंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना बैठकीतील चर्चे बाबद दिली.
टोपे म्हणाले, मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही नक्कीच चिंतेची बाब आहे. मात्र, तूर्तास तरी लॉकडाऊनची गरज नाही. पण रुग्णसंख्या पाहून योग्यवेळी निर्बंध लावण्यासंदर्भात निर्णय घेण्यात येईल.
राजेश टोपे काय म्हणाले –
– राज्यात आता होम क्वारंटाइनचा कालावधी सात दिवसांचा करण्यात आला आहे. या आधी हा कालावधी 10 दिवसांचा होता. सात दिवसांच्या होम क्वारंटाईन कालावधी नंतर संबंधित व्यक्तीची आरटीपीसीआर चाचणी करणे आवश्यक असेल.
– मागील काही दिवसांपासून राज्यात बाधितांची संख्या वाढत आहे. तीन दिवसात कोरोनाबाधितांची संख्या दुप्पट होत आहे. ही चिंतेची बाब आहे. मात्र, त्यातील 90 टक्के लोकांना लक्षणे नाहीत.
– अँटिजन टेस्ट करण्यावर भर देण्यात येणार असून यासाठी आता चौका चौकात अँटिजन चाचणीसाठी बुथ उभारण्यात येणार आहे. अँटिजन पॉझिटिव्ह आल्यास RTPCR चाचणी करण्याची गरज नाही.
– लस न घेणाऱ्या नांगरिकां विरोधात कठोर कारवाई केली जाईल.
– सध्याच्या नियमांप्रमाणे बुस्टर डोस शासकीय रुग्णालयात घ्यावे लागणार आहे. मात्र, खासगी रुग्णालयांना त्यांच्या कर्मचाऱ्यांना बुस्टर डोस त्यांच्याच रुग्णालयात देण्यास परवानगीग देण्यात आली आहे.
