गुरूवारी पुण्यातील ‘या’ भागांमध्ये पाणीपुरवठा राहणार बंद
पुणे : पुणे शहराच्या काही भागांना गुरुवारी पाणीपुरवठा बंद राहणार आहे, असे पुणे महापालिकेच्या जलविभागाचे निवेदनात स्पष्ट केले आहे.
पुणे महानगरपालिकेने गुरुवारी पर्वती, वडगाव आणि कॅन्टोन्मेंट जलशुद्धीकरण केंद्रांवर विद्युत आणि बांधकाम संबंधित उपक्रमांचे नियोजन केले आहे. त्यामुळे या जलशुद्धीकरण केंद्रांवर अवलंबून असलेल्या भागांना पाणीपुरवठा होणार नाही. पुणे महानगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे विभागप्रमुख अनिरुद्ध पावसकर यांनी गुरुवारी शहरातील बहुतांश भागात पाणीपुरवठा बंद ठेवण्याची घोषणा केली. तर शुक्रवारी कमी दाबाने पाणी पुरवठा केला जाणार आहे.
‘या’ भागातील पाणी पुरवठा राहणार बंद –
सर्व पेठ परिसर, शिवाजीनगर, लोकमान्यनगर, स्वारगेट, मुकुंदनगर, भवानी पेठ परिसर, पुणे कॅन्टोन्मेंट, हडपसर, मगरपट्टा, सोलापूर रस्ता, मुंढवा, उरुळी देवाची, हिंगणे, आनंदनगर, कात्रज, आंबेगाव, भारती विद्यापीठ आणि कोंढवा परिसर.
