स्वरप्रवाह ग्रूपने जिल्हास्तरीय युवा महोत्सवात मारली बाजी
वाघ्या मुरळी लोकगीताचे सादरीकरण करुन पटकाविला प्रथम क्रमांक
लोकनृत्यात भांगडा सादर करुन पूना काॅलेज द्वितीय
पुणे : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय पुणे ,राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटना व पूना कॉलेज ऑफ आर्ट्स सायन्स कॉमर्स पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जिल्हास्तरीय युवा महोत्सवात चंदननगरच्या स्वरप्रवाह ग्रुपने लोकगीताचे सादरीकरण करुन प्रथम तर लोकनृत्यामध्ये उंड्रीच्या डान्स एडिक्टस अकॅडमीने लोकनृत्यात प्रथम क्रमांक पटकाविला.
पुना कॉलेजच्या पीमसे हॉलमध्ये क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त पुणे जिल्हास्तरीय युवा महोत्सवचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी प्रमुख पाहुणे सोनल नागपुरे, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश बागुल, सहाय्यक अधिकारी शिल्पा चाबुकस्वार, राष्ट्रपती युवा पुरस्कार विजेते व पूना कॉलेजचे प्राचार्य डॉ. आफताब अन्वर शेख ,राष्ट्रीय एकात्मता विद्यार्थी संघटनेचे अध्यक्ष ताहेर आसी, उपप्राचार्य लूबना खान, उपप्राचार्य इक्बाल शेख, क्रीडा संचालक डॉ.आयाज शेख, डॉ.बाबा शेख, डॉ.शाकीर शेख, क्रीडा शिक्षक इम्रान पठाण, अशद शेख, उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यात अमित खराडे, शाहीन कुरेशी, मुदस्सर शेख, समीर रंगरेज, परवेज शेख, इमरान बेग, फारुख शेख, अब्दुल रहमान, शेख शेरबानु, समीना गडेड, वसुधा व्हावळ, सबा हुसेन यांनी परिश्रम घेतले
स्वरप्रवाह ग्रुपने वाघ्या मुरळी लोकगीताचे सादरीकरण करुन लोकगीतामध्ये प्रथम क्रमांक पटकाविला तर सेंट मीराज इंग्लिश मीडियम सेकंडरी स्कूलच्या मुलींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या शौर्याचा पोवाडा सादर करीत द्वितीय क्रमांक मिळवला. लोकनृत्यामध्ये उंड्रीच्या डान्स एडिक्ट्स अकॅडमीने पंजाबचे लोकनृत्य भांगडा सादर केला व प्रथम क्रमांक मिळवला तर पूना कॉलेजने द्वितीय क्रमांक मिळवला. कोविडच्या पार्श्वभूमीवर ऑनलाईन व ऑफलाईन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
