Saturday, June 13, 2026
Latest NewsPUNE

पालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्‍ती

पुणे : गेल्या काही दिवसांपासून शहरात कोरोनाच्या रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत असताना पुणे महापालिका प्रशासनाकडून कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरी सक्‍तीची केली आहे. त्यामुळे, शहराच्या करोना नियंत्रणाची जबाबदारी असलेल्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांमध्येच मोठ्या प्रमाणात करोना प्रसाराचा धोका निर्माण झाला आहे.

बायोमेट्रिक हजेरीसाठी अनेक कर्मचारी एकच मशीन वापरतात. त्यामुळे कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेत महापालिकेने राज्यशासनाच्या आदेशानुसार, कोरोना प्रतिबंधात्मक उपाय म्हणून बायोमेट्रिक हजेरी बंद केली होती. त्यानंतर कोरोना रुग्ण कमी झाल्याने तसेच शहरात कोरोनाची साथ नियंत्रणात आल्याने महापालिका प्रशासनाने दोन दिवसांपूर्वी स्वतंत्र आदेश काढत महापालिका कर्मचाऱ्यांना बायोमेट्रिक हजेरीची सक्‍ती केली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading