Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

‘ती’ महिला स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी यंत्रणा

पुणे : शहरात महिलांसाठी असणार्या ‘ती’ महिला स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी यंत्रणा उभारुन देखभाल दुरुस्तीसाठी साराप्लास्ट या संस्थेशी पुढील अकरा महिन्यांसाठी प्रायोगिक तत्वावर करार करण्यास स्थायी समितीने मान्यता दिल्याची माहिती अध्यक्ष हेमंत रासने यांनी आज पत्रकार परिषदेत दिली.

रासने म्हणाले, पीएमपीएमएलच्या वापरात नसणार्या बसेसचे रुपांत महिला स्वच्छतागृहात करण्यात आले आहे. या स्वच्छतागृहांमध्ये सॅनिटरी पॅड डिस्पोजल मशिन, टॉयलेट सिट सॅनिटायझर, हॅन्ड सॅनिटायझर, जनजागृतीसाठी दूरचित्रवाणी संच इत्यादी सुविधा देण्यात आलेल्या आहेत.

रासने म्हणाले, या बसेसमध्ये दोन विभाग असून एका विभागात टॉयलेट आणि वॉश बेसिन आहे. दुसर्या विभागात चहा, कॉफी, पिण्याचे पाणी, शीतपेय यांची विक्री, जाहिरात, पे अण्ड यूज, भाडेतत्वावरील उत्पन्न घेऊन त्याद्वारे देखभाल आणि दुरुस्ती करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता. पे अण्ड यूजद्वारे पाच रुपये प्रती व्यक्ती शुल्क आकारण्यास मान्यता देण्यात आली आहे.

सिंध सोसायटी-औंध, संभाजी पार्क, सिमला ऑफीस, शनिवारवाडा, ग्रीन पार्क हॉटेल-बाणेर, आनंद नगर-सिंहगड रस्ता, छत्रपती शिवाजी उद्यान-बोपोडी, आरटीओ-फुले नगर, लोहगाव बसस्टॉप, संविधान चौक-विश्रांतवाडी या अकरा ठिकाणी ‘ती’ महिला स्वच्छतागृहांची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading