कॉँग्रेसच्या प्रभारी सोनल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कार्यालयाला भेट
पुणे : अखिल भारतीय काँग्रेसचे सरचिटणीस व महाराष्ट्राच्या प्रभारी श्रीमती सोनल पटेल यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे कार्यालयाला भेट दिली. यावेळी त्यांनी संपूर्ण कार्यालयची माहिती अंकुश काकडे यांचेकडून घेतली. अतिशय अद्ययावत कार्यालय बनवल्याबद्दल समाधान व्यक्त केले. याप्रसंगी अध्यक्ष प्रशांत जगताप यांनी शाल, श्रीफळ आणि पुस्तक भेट देऊन त्यांचे स्वागत केले.
त्यानंतर चर्चेमध्ये पटेल यांनी राष्ट्रवादी व काँग्रेस पक्षाची विचारधारा एकच आहे. त्यामुळे आपण एकत्रच काम करायला हवं, असे त्यांनी सांगितले. जगताप यांनी येणारी महानगरपालिका आम्ही सर्वांना बरोबर घेऊन जाण्याचा आमचा प्रयत्न आहे. सध्याची काँग्रेसची परिस्थिती पुण्यात कशी आहे हे काकडे यांनी त्यांना सांगितले. यावेळी श्रीमती संगीता तिवारी यादेखील उपस्थित होत्या.
