अखेर MPSC ने ‘गौताळा औत्रमघाट’ हे अभयारण्य म्हणून केले मान्य
पुणे : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020 दिनांक 4 सप्टेंबर 2021 रोजी घेण्यात आली. ही परीक्षा PSI,STI,ASO या पदांकरिता घेण्यात आली होती. अंतिम उत्तरतालिका 17 नोव्हेंबर 2021 रोजी प्रसिद्ध करण्यात आली. यात Set A मधील Que No.27 बरोबर प्रश्न रद्द करण्यात आले. परंतु या उत्तरपत्रिकेवर विद्यार्थ्यांनी आक्षेप घेतला असून बाधित झालेले बहुसंख्य विद्यार्थी आता न्यायालयात गेलेले आहे, अशी माहिती स्पर्धा परीक्षा अभ्यास करणारे विद्यार्थी सुरज पवार यांनी दिली आहे.
आयोगाच्या 4 सप्टेंबर रोजीच्या प्रश्नपत्रिकेत’ आयोगाने गौताळा औट्रमघाट हे ‘राष्ट्रीय उद्यान’ असे नमूद केले आहे. प्रथम आयोगाने हे उत्तर बरोबर दिले व विद्यार्थ्यांनी न्यायालयात जाताच आणि वृत्तपत्रांनी दखल घेताच दिनांक 25 November रोजी MPSC आयोगाने ने हे प्रश्न आडमुठेपणाने रात्री साडे आठ वाजता इतिहासात प्रथम तृतीय उत्तर तलिका प्रसिद्ध करून बरोबर प्रश्न रद्द ठरवले.
राष्ट्रिय उद्यान आणि अभयारण्य यांच्या निकष मधील फरक लक्षात घेता हे विधान चूक ठरत आहे आणि MPSC बरोबर उत्तर द्यायचे सोडून बरोबर प्रश्नच रद्द केलेला आहे.
वन विभागाच्या अधिकृत वेबसाईट वर सुद्धा याचा संदर्भ हा गौताळा अभयारण्य असाच आढळून येत आहे. शासन दफ्तरी जर गौताळा हे अभयारण्य अशी नोंद आहे तर ते प्रश्नपत्रिकेत *गौताळा ‘राष्ट्रीय उद्यान’ कसे बरोबर येत आहे ? *हा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्याचा कोणताही सबळ पुरावा मिळत नाही एकंदरीत काय तर आयोगाच्या ह्या अश्या धोरणांचा नुकसान हे सर्वसामान्य विद्यार्थ्यांचे होत आहे.
विद्यार्थ्यांनी ज्या प्रश्नांवर आक्षेप घेतले आहेत त्यावर आयोगाने पुनर्विलोकन करावे व सुधारित चौथी उत्तरतालिका प्रसिद्ध करावी आणि पुढील प्रक्रिया ही पारदर्शी आणि निःशंकृत करावी अशी मागणी विद्यार्थी, विविध विद्यार्थी संघटना आणि पालकवर्ग तसेच सामाजिक संघटनामार्फत होत आहे.
