Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या ओव्हरहेड केबल्स महापालिका काढणार

पुणे : इंटरनेट, टीव्ही, मोबाईल, वीज पुरवठा याच्या केबल्स भूमिगतच असल्या पाहिजे असा कायदा आहे. मात्र, शहरात तब्बल ७ हजार ४४० किलोमीटर लांबीच्या बेकायदा केबल्स टाकल्याचे महापालिकेने केलेल्या सर्वेक्षणात समोर आले. या केबल्स दंड व खोदाई शुल्क भरून अधिकृत करून न घेतल्यास त्या महापालिकेतर्फे कापून टाकल्या जाणार आहेत.

पुणे महापालिका उत्पन्न वाढीसाठी नवे स्रोत शोधत आहे. त्यामध्ये शहराचे विद्रूपीकरण करणाऱ्या ओव्हरहेड केबल्स शोधून काढण्याचा निर्णय घेतला. गेल्या अनेक वर्षापासून महापालिका प्रशासनाने सोईस्कर दुर्लक्ष करत असल्याने मोबाईल, इंटरनेट, टीव्ही चॅनेल्सची सेवा पुरविणाऱ्या कंपन्यांनी हजारो किलोमिटरच्या बेकायदेशीर ओव्हरहेड केबल टाकल्या. यातून कंपन्या कोट्यवधी रुपयांचे उत्पन्न मिळवतात पण महापालिकेचे उत्पन्न बुडत आहे.

दोन महिन्यांपूर्वी स्थायी समितीने बेकायदा केबल्सचे सर्वेक्षण करण्यासाठी संस्थेची नियुक्ती केली होती. या संस्थेने पथ विभागाला गेल्या आठवड्यात अहवाल सादर केला. यामध्ये जिओ डिजिटल फायबर प्रा. लि. कंपनीची ३ हजार ८९० किलोमीटर, ई व्हीजन टेले इन्फ्रा प्रा. लि. कंपनीची ३ हजार ५५० किलोमीटर लांबीची बेकायदा केबल आढळून आली. ई व्हीजन टेले इन्फ्रा प्रा. लि. कंपनीकडून प्रमुख मोबाईल कंपन्या केबल टाकून घेण्याचे काम करतात. यामध्ये एअरटेलने १ हजार ४५०किलोमीटर, व्होडाफोन-आयडिया कंपनीने ८२५ किलोमीटर तर टाटा कम्युनिकेशनने १ हजार २७५ किलोमीटर बेकायदा केबल टाकली आहे. त्यामुळे या कंपन्यांना महापालिकेने नोटीस बजावून १५ दिवसात उत्तर देण्याचे आदेश दिले आहेत.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading