Monday, June 15, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

अहमदनगर जिल्ह्यात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’

अहमदनगर : अहमदनगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने प्रशासन सतर्क झाले आहे. या पार्श्वभूमीवर नगर जिल्ह्यात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’ ही मोहिम आजपासून राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

कालच राज्य सरकारने कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काही अतिरिक्त नियम लागू केले आहेत. त्यातच आज नगर जिल्ह्यात ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण सापडल्याने जिल्हा प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेतला आहे. अहमदनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी हा महत्त्वाचा निर्णय घेतला असून संपूर्ण जिल्ह्यात हा नियम लागू करण्यात आला आहे. या मुळे लस न घेतलेल्या नागरिकांना सार्वजनिक ठिकाणी जाता येणार नाही.

कशी आहे नवीन नियमावली
1) अहमदनगर जिल्ह्यातील सर्व शासकीय/निमशासकीय कार्यालये, खाजगी आस्थापना/कार्यालये,
व्यावसायिक व औदयोगिक आस्थापना, हॉटेल, रेस्टॉरंट, शॉपिंग मॉल, नाट्यगृहे, सिनेमागृह,
लॉन्स, मंगल कार्यालये, कृषी उत्पन्न बाजार समिती व इतर समारंभ, मेळावे व तत्सम सर्वच
सार्वजनिक ठिकाणी व कार्यक्रमात ‘नो वॅक्सिन नो एन्ट्री’ याप्रमाणे निर्बंध लागू केले आहेत.

2) वरीलप्रमाणे प्रत्येक आस्थापनांनी त्यांच्या कार्यस्थळी येणाऱ्या नागरिकांनी कोविड प्रतिबंधात्मक लसीकरणाची किमान एक मात्रा घेतल्याची खात्री करणे बंधनकारक राहणार आहे. खात्री केल्याशिवाय प्रवेश दिला जाणार नाही.

3) वरील ठिकाणी प्रवेश करताना प्रत्येक व्यक्तीने योग्य पध्दतीने मास्क लावणे बंदनकारक करण्यात आले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading