Saturday, June 20, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

सर्वांनी एकत्रित लढाव, हा मानस – आदित्य ठाकरे

पुणे: शिवसेनेचे नेते राज्याचे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे हे पुणे दौर्‍यावर आले होते. त्यावेळी युवा सेनेच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा पुणे स्टेशन येथे आयोजित करण्यात आला होता.त्यानंतर प्रसार माध्यमांशी त्यांनी संवाद साधला.त्या दरम्यान आगामी महापालिका निवडणुकीमध्ये युती की आघाडी होणार असा प्रश्न विचारला असता. आदित्य ठाकरे म्हणाले की,खूप दिवसानंतर आम्ही सर्व पदाधिकारी एकत्र आलो आहोत, जे काही असत, ते शिवसेनेच खुल असते. अगोदर निवडणुका तर जाहीर होऊ द्या.आमच एकच आहे की, महाराष्ट्राचा विकास करणे हे गरजेचे आहे आणि ते आम्ही करीत आहोत.

महाविकास आघाडी सरकार मार्फत करोना काळात किंवा त्यापूर्वी काम करीत आलो आहोत. विकास कामे कुठे ही थांबलेली नाहीत.मुख्यमंत्री,उपमुख्यमंत्री आणि महसुल मंत्री महोदय आम्ही सर्व मिळून एकत्रित काम करीत आहोत, ज्या काही महापालिकेच्या निवडणुका लागतील किंवा असतील.करोनाचा काळ पाहून,पण निवडणुका लवकरच लागतील.हे सर्वांनाच वाटत आहे.सर्वांनी एकत्रित लढाव, हा मानस असल्याची भूमिका यावेळी त्यांनी मांडली.तसेच महाराष्ट्राला पुढे नेण्याच काम सर्व ठिकाणी व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.तर ख्रिसमस, नातळ आणि नवीन वर्षाच स्वागत करताना,सर्वांनी कोरोना नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील त्यांनी यावेळी केले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading