Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

रंगून वाला दंत महाविद्यालयाचा द्वी-दशकपूर्ती समारंभ उत्साहात

पुणे : महाराष्ट्र कॉस्मॉपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या एम.ए. रंगुनवाला दंत महाविद्यालयाचा द्वी-दशकपूर्ती समारंभ बुधवारी उत्साहात पार पडला. संस्थेचे अध्यक्ष डॉ.पी. ए. इनामदार कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी होते.

संस्थेच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार,प्राचार्य डॉ.रमणदीप दुग्गल, उपप्राचार्य डॉ. विवेक हेगडे, कुलसचिव आर.ए. शेख , विद्यार्थी -प्राध्यापक उपस्थित होते. हा कार्यक्रम संस्थेच्या असेंब्लि हॉलमध्ये बुधवारी सकाळी झाला.

प्राचार्य डॉ.रमणदीप दुग्गल यांनी दंत महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. गुणवंत विद्यार्थी तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीत योगदान देणाऱ्या प्राध्यापक ,सेवकांचा सत्कार करण्यात आला.जर्मनी येथील परिषदेत १ लाख ८५ हजाराचे प्रथम पारितोषिक मिळविणाऱ्या डॉ मोहसीन शेख यांचा सत्कार करण्यात आला . आर ए शेख ,प्रा यास्मिन झुबेरी यांनी मनोगत व्यक्त केले . डॉ. सालिका शेख यांनी सूत्रसंचालन केले.

‘विद्यार्थ्यानी केवळ करीयर करु नये, मोठी स्वप्ने पाहावीत, समाजाच्या उपयोगाच्या संस्था सुरू कराव्यात ‘, असे आवाहन आबेदा इनामदार यांनी त्यांच्या भाषणात केले.डॉ.पी. ए. इनामदार म्हणाले, ‘रंगूनवाला कुटुंबीयांच्या मदतीने हे दंत महाविद्यालय उभे राहिले. भारतीय समाजात औदार्य आहे, पण, प्रामाणिक व्यक्तींना ते चांगल्या कामासाठी मिळते. विद्याथ्र्यांनी पालकांच्या अपेक्षा पूर्ण कराव्यात, स्वातंत्र्याचा गैरवापर करु नये. आपल्या ज्ञानाचा इतरांना फायदा करून द्यावा. ‘

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading