Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

बंगळूरतील घटनेच्या निषेधार्थ मराठा क्रांती मोर्चा चे आंदोलन

पुणे : छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक येथे झालेल्या विटंबनेचे पडसाड काल पासून महाराष्ट्रात उमटत आहेत. आज मराठी क्रांती मोर्चा संघटनेतर्फे याचा निषेध करण्यात आला.
याचा निषेध आज पुण्यात मराठी क्रांती मोर्चा संघटनेतर्फे छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, कोथरूड येथे व्यक्त करण्यात आला.

या आंदोलनाचे नेतृत्व जितेंद्र कोंढरे पुणे जिल्हा समन्वयक मराठी क्रांती मोर्चा यांनी केले.
या आंदोलनाला युवराज मदगे समन्वयक,रोहिदास सुतार,संजय खोपडे,गणेश मापारे उपस्थित होते.
जितेंद्र कोंढरे म्हणाले, दोन दिवसापूर्वी शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची कर्नाटक येथे झालेल्या विटंबन हे एकदम चुकीचे आहे. आम्ही निषेध आंदोलनातून कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनि ज्या नराधमांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे विटंबन केले आहे. त्या नराधमांना लवकरात लवकर अटक करावी अशी आमची मागणी आहे. म्हणून आज आम्ही आंदोलन करत आहोत. असे जितेंद्र कोंढरे म्हणाले.

Leave a Reply