Wednesday, September 16, 2026
Latest NewsPUNE

PCMC – सांगवीत व्यावसायिकावर भरदिवसा गोळीबार

पिंपरी : सांगवीत आज एका व्यावसायिकावर भर दिवसा गोळीबार करण्यात आला. यात व्यवसायिक गंभीर जखमी झाला आहे. पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकात शनिवारी (दि. १८) सकाळी दहाच्या सुमारास ही घटना घडली.

योगेश जगताप (रा. पिंपळे गुरव), असे जखमी झालेल्या व्यावसायिकाचे नाव आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, पिंपळे गुरव येथील काटेपुरम चौकातील दत्त मंदिर येथे दत्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.

त्या कार्यक्रमाची पूर्वतयारी सुरू असताना योगेश जगताप हे सकाळी दहाच्या सुमारास तेथे आले. त्यावेळी दोन अज्ञातांनी त्यांचा पाठलाग करून गोळीबार केला. अज्ञातांनी चार गोळ्या झाडल्याचे सांगण्यात येत आहे. या गोळीबारात योगेश जगताप गंभीर जखमी झाले. गोळीबारानंतर हल्लेखोरांनी परिसरातील एका मेडिकल दुकानदाराला धमकावून त्याची दुचाकी घेऊन पळ काढला.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading