कै. हनुमंतराव तुकाराम थोरवे प्राथमिक विद्यालय येथे टाकाऊतून टिकाऊ असा सेल्फी पॉइंट
पुणे : बऱ्याच अवधीनंतर शाळा पुन्हा सुरू झाली त्यानिमित्ताने कै. हनुमंतराव तुकाराम थोरवे प्राथमिक विद्यालय( मनपा शाळा क्र१६२ बी) चंद्रभागा नगर कात्रज शाळेत बालचमुंचे स्वागत झाले.
विद्यार्थ्यांना शाळेची ओढ वाटावी आणि नवनवीन आकर्षण निर्माण व्हावे त्या प्रेरणेने आम्ही शाळेतील सर्व शिक्षकांनी मिळून टाकाऊतून टिकाऊ असा सेल्फी पॉइंट तयार केला जेणेकरून मुले तिथे येऊन आपला फोटो काढतील व आनंदाने वर्गात जातील आणि बाकीच्या मुलांनाही प्रोत्साहन मिळेल असा एक आगळा-वेगळा उपक्रम राबविला गेला.
आज विद्यार्थ्यांचे स्वागत ढोल वाजवून , सनई चे सुर ,सुस्वागतम ची रांगोळी काढून, फुगे लावून , विद्यार्थ्यांना पुष्प व चॉकलेट देऊन, विद्यार्थ्यांचा फोटो फ्रेम मध्ये सेल्फी, विद्यार्थ्यांचे औक्षण ,पावलांचे ठसे, त्याचबरोबर सॅनिटायझर चा वापर, तापमान व ऑक्सी मीटर तपासणी या सर्व कारोना नियमांचे पालन करून शाळा सुरू करण्यात आली या कार्यक्रमासाठी साह्य.प्रशा. अधिकारी मा. जयेश शेंडकर साहेब , पर्यवेक्षक मा. काळे मॅडम प्रभारी मुख्याध्यापक कदम मॅडम ,शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष व सदस्य आणि सर्व सहकारी वर्ग यांच्या उपस्थितीत आज शाळा सुरू करण्यात आली. हे सगळं पाहताना पालकांच्या चेहऱ्यावर खूप आनंद होता व पालकांनी शाळेचे कौतुक केले.
