Thursday, June 18, 2026
BusinessLatest News

सचिन तेंडुलकर यांची स्पिनीमध्ये गुंतवणूक

मुंबई : वापरलेल्या गाड्यांच्या खरेदी आणि विक्रीसाठीचा संपूर्ण सुसज्ज ऑनलाईन ते ऑफलाईन रिटेल प्लॅटफॉर्म असणाऱ्या स्पिनीने महान भारतीय क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याशी भागीदारी केली आहे. सचिन कंपनीत धोरणात्मक भागीदार असून ब्रँड प्रचारकही असणार आहे. मास्टरब्लास्टरशी केलेल्या सहयोगातून स्पिनीने जपलेल्या बांधिलकीत एक नवा अध्याय लिहिला जाणार आहे. 

सर्वोच्च पातळीची सचोटी राखत सर्वोच्च पातळीवर सातत्याने चांगली कामगिरी करण्यासाठी सचिन तेंडुलकर ओळखला जातो. तशाच मूल्य व्यवस्थेसह तरुण भारतीयांना प्रेरणा देण्याच्या उद्देशाने स्पिनीने कामगिरी, लवचिकता आणि सातत्यपूर्ण सुधारणा यासाठी ओळखल्या जाणाऱ्या वैश्विक आदर्श व्यक्तीसोबत काम करण्याचा निर्णय घेतला.

या सहयोगाबद्दल बोलताना सचिन म्हणाला, “आपला देश अधिकाधिक तरुण होत आहे आणि आपल्या महत्वाकांक्षा मोठ्या बनत आहेत. आजचे उद्योजक अशा सुविधा निर्माण करत आहेत ज्यामुळे या आकांक्षाना धुमारे फुटत आहेत. योग्य प्रकारे सुविधा निर्मितीची आकांक्षा असणाऱ्या स्पिनीशी सहयोग करताना मला खूप आनंद होत आहे. टीमने आपल्या व्यवसायात सर्वोत्तमता साध्य करण्यासाठी विश्वास, पारदर्शकता आणि प्रामाणिकपणा या कालातीत मुल्यांचा अंगीकार केला आहे. मी आता या कुटुंबाचा एक भाग झालो आहे आणि एकत्रितपणे आम्ही करू ती प्रत्येक गोष्ट अधिक चांगली करण्याची आम्हांला आशा आहे.”

स्क्वाड स्पिनीचे कॅप्टन म्हणून आणि एक गुंतवणूकदार म्हणून सचिन तेंडुलकर यांचे मंडळावर स्वागत करताना स्पिनीचे संस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी नीरज सिंग म्हणाले, “आव्हानांचा मुकाबला करताना दृढता आणि निर्धार ही मूल्यं किती महत्वाची असतात हे त्यांच्या जीवनप्रवासाकडे बघून कळते. आम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीत आम्ही या क्षमता रुजविण्याचा आणि ग्राहकांच्या खऱ्या समस्या सोडवण्याचा प्रयत्न करू. स्पिनीच्या मंडळावर त्यांचे स्वागत करताना आम्ही अत्यंत भारावून गेलो आहोत आणि आम्ही अत्यंत अभिमानाने आमच्या स्क्वाड स्पिनीचे नवोदित कॅप्टन म्हणून सचिन रमेश तेंडुलकर यांचे स्वागत करत आहोत.”

 

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading