पुणे शहरातील ‘या’ भागाचा पाणी पुरवठा गुरुवारी बंद राहणार
पुणे:पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या बंडगार्डन पाणीपुरवठा केंद्रांतर्गत मुख्य जल वाहिन्यांवरील देखभाल दुरुस्तीची कामे करण्यात येणार आहेत. तसेच ठाकरसी टाकी व भामा आसखेड येथील पंपींग, तातडीचे देखभाल दुरुस्तीचे कामे करण्यात येणार आहेत. त्यामुळे येत्या गुरुवारी (दि.16) रोजी पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे.
तसेच शुक्रवारी शहरात सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाच्या मुख्य अभियंता यांनी कळवले आहे.
गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद
बंडगार्डन जलकेंद्र भाग – येरवडा पूर्ण, लक्ष्मीनगर, यशवंत नगर, भाटनगर, जयजवान नगर, आंबेडकर सोसायटी, संगमवाडी, सुरक्षानगर, माणिकनगर, म्हाडा वसाहत, अशोकनगर, जयप्रकाश नगर, गांधीनगर, शास्त्रीनगर, कल्याणीनगर संपुर्ण परिसर, आदर्शनगर, हरीनगर, रामवाडी, आळंदी रोड, भारतनगर, शांतीनगर, मोहनवाडी, जाधवनगर, मेंटल हॉस्पिटल परिसर, साप्रस, फुले नगर, भारतनगर, आदर्श इंदिरा नगर, विश्रांतवाडी, प्रतिकनगर, कस्तुरबा सोसायटी, पंचशीलनगर, श्रमीक वसाहत, नागपुर चाळ, हौसिंगबोर्ड, शांतीरक्षक सोसायटी, राम सोसायटी, अहिल्यापर्णकुटी सोसायटी, कलवड, खेसे पार्क, धानोरी, मुंजाबा वस्ती, भैरवनगर, श्रमिकनगर, विमाननगर, सोपान नगर, गुरुद्वारा, दादाचीवस्ती, लोहगाव, टेम्पो चौक, साईनाथनगर, वडगांवशेरी संपुर्ण परिसर.
