Thursday, June 25, 2026
ENTERTAINMENTLatest News

मधुरा वेलणकर ‘तुमची मुलगी काय करते’ मध्ये  निभावणार धाडसी भूमिका

पुणे : आपल्या मुलांच्या चुका पदरात घेणारी आणि वेळप्रसंगी मुलांची ढाल होणारी हि आईची दोन रूपं असतात. मुलांच्या जीवावर बेतल्यावर काहीही करायला तयार असणाऱ्या आईचे रौद्र रूप सोनी मराठी वाहिनीवर सुरु होत असलेल्या  तुमची मुलगी काय करते  या  नव्या मालिकेत पाहायला मिळणार आहेत .मालिकेचे शीर्षकच सध्याच्या सर्वसामान्य माणसाच्या सत्य परिस्थितीची जाणीव करून देणार आहे . मध्यमवर्गीय घरात , मुलांवर जेव्हा संकट येत तेव्हा घरातली कर्ती स्त्री , एक आई त्या संकटाचा कसा धीराने , ताकदीने सामना करते हे मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या समोर येणार आहे . एखादं  भयानक संकट स्वतः च्या मुलांवर आल्यावर शस्त्रही उचलायला तयार झालेल्या आईचा प्रवास या मालिकेतून समोर येणार आहे .

एक शिक्षिका, एक कर्तव्यदक्ष आई आणि स्वतःच्या मुलीच्या जीवावर बेतल्याने वाघीण झालेली आई या अशा धाडसी भूमिकेत मधुरा दिसणार आहे.  तर पोलीस इन्स्पेक्टर च्या मुख्य भूमिकेत हरिश दुधाणे भूमिका साकारताना दिसणार आहे .या मालिकेची निर्माती मनवा नाईक करत असून पटकथा लेखन अभिनेता आणि लेखक चिन्मय मांडलेकर करत आहे तर संवाद लेखन मुग्धा गोडबोले लिहीत आहेत . या मालिकेचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते  दिग्दर्शक भीमराव मुडे करत आहे

आतापर्यंत वेगवेगळ्या  स्वरूपाच्या मालिका प्रेक्षकांसाठी आणणारं  सोनी मराठी पहिल्यांदाच थरार मालिका प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे पाहायला विसरू नका तुमची मुलगी काय करते २० डिसेंबरपासून सोम – शनि रात्री १० वाजता फक्त्त सोनी मराठीवर .

 

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading