पुणे महापालिकेवर शिक्षक व जुनी पेन्शन हक्क संघटनेचा विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा
पुणे : पुण्यातील शिक्षकांच्या अजूनहि काही मागण्या अनेक वर्षापासून या प्रलंबित आहेत. शिक्षकांनी अनेक वेळा महानगरपालिकेतल्या अधिकाऱ्यांची आमच्या मागण्या लवकर सोडवावेत म्हणून भेट घेतली. तरी अनेक वर्षापासून महानगरपालिकेतील अधिकाऱ्याने आश्वासन दिले. म्हणून आज पुणे महानगरपालिकेवर जुनी पेन्शन हक्क संघटने तर्फे व शिक्षकानी विविध मागण्यांसाठी आक्रोश मोर्चा काढला.
या आकृती मोर्चाचे नेतृत्व जुनी पेन्शन हक्क संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र पोकळे यांनी केले.
या आंदोलनाला जुनी पेन्शन हक्क संघटनेचे कार्यकर्ते व मोठ्या प्रमाणात शिक्षक उपस्थित होते.
शिक्षक व जुनी पेन्शन हक्क संघटनेच्या मागण्या सर्व माध्यमांच्या शिक्षकांच्या बदल्या कराव्या,
सातव्या वेतन आयोगाची अंमलबजावणी थकित द्वारा करणे,कोविड मध्ये जी शिक्षकांची कपात केली होती ती रद्द करणे. जी शिक्षकांची रजा रद्द केली होती ती कॅन्सल करणे.
