Tuesday, September 15, 2026
Latest NewsMAHARASHTRAPUNETOP NEWS

म्हाडा पेपर फुटी प्रकरणी औरंगाबाद येथून तीन तर पुण्यातून तीन जणांना अटक

पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांची माहिती 

पुणे : म्हाडा पेपर फुटी प्रकरणी औरंगाबाद वरून तीन तर पुण्यातून तीन जणांना असे एकूण सहा जणांना अटक केली आहे. पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.   

आज रविवार रोजी होणारी म्हाडाची नोकर भरती परीक्षा पेपर फुटल्याच्या कारणास्तव जानेवारीपर्यंत रद्द करत असल्याची माहिती राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी काल रात्री उशिरा दिली. अनेक विद्यार्थ्यांची यामुळे गैरसोय झाली. 

या प्रकरणी माहिती देताना पुण्याचे पोलिस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले की, या पेपरफुटी प्रकरणी औरंगाबाद वरून तीन तर पुण्यातून तीन जणांना असे एकूण सहा जणांना अटक केली आहे. त्याच बरोबर एमपीडीए अंतर्गत 50 जणांना स्थानबद्ध करण्यात आले आहे. या अटक करण्यात आलेल्या आरोपींना 18 डिसेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली असल्याचे देखील गुप्ता यावेळी सांगितले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading