Monday, June 22, 2026
Latest NewsPUNE

ॲड. प्रणिता देशपांडे यांची विश्व दलित परिषदेच्या अंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लीगल अडवायजर पदी नियुक्ती.

पुणे : विश्व दलित परिषद ( एक अंतर राष्ट्रीय आंदोलन)या जागतिक स्तरावील सामाजिक कार्य करणारी संघटना आहे त्या संघटनेची नुकतीच राष्ट्रीय कार्यकारिणी ची बैठक संघटनेचे अंतरराष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र पाल सिंह चमार यांच्या अध्यक्षतेखाली आणि राष्ट्रीय अध्यक्ष मा. खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या प्रमुख उपस्थितीत दिल्ली ला सपंन्न झाली. या बैठकीत पहिल्यांदाच संघटने च्या अंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लिगल अडवायजर या पदावर नेदरलँड येते राहत असणार्‍या मूळ भारतीय ॲड.  प्रणिता अद्वैत देशपांडे यांची सर्वानुमते नियुक्ती करण्यात आली.

विश्व दलित परिषद चे आंतरराष्ट्रीय तथा भारत भर सुरु असलेल्या कामावर प्रभावित होऊन जन्मानी ब्राह्मण असून सुद्धा दलित चळवळीत काम करण्याची इच्छा नेदरलँड स्थित अत्यंत प्रतिष्ठित अशा उद्योजक आणि प्रसिद्ध वकील आंतरराष्ट्रीय पत्रकार असलेल्या ॲडवोकेट प्रणिता अद्वैत देशपांडे यांनी राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड यांच्या कडे व्यक्त केल्यानुसार त्यांच्या कामाचे स्वरूप आणि व्याप्ती पाहून त्यांची नियुक्ती संघटनेच्या अंतर राष्ट्रीय उपाध्यक्ष तथा लिगल अडवायजर पदी नियुक्ती केली आहे.

त्यांच्या नियुक्ती बद्दल अंतर राष्ट्रीय अध्यक्ष भूपेंद्र पाल सिंह चमार, राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रोफेसर डॉ सुनील बळीराम गायकवाड, राष्ट्रीय महासचिव प्रोफेसर डॉ वाल्मीक के सरवदे, राष्ट्रीय उपाध्यक्ष मोहन रेवाप्पा माने, राष्ट्रीय सचिव हरिभाऊ गायकवाड, महाराष्ट्र अध्यक्ष ॲडवोकेट शिरीन वारे, तामिनाडू चे प्रदेश अध्यक्ष विनायगा मूर्ती, तामिळनाडू, आंध्र, तेलंगणा, गुजरात चे प्रभारी विनोद जाधव,प्रदेश प्रवक्ते तथा विधी सलहागार ॲडवोकेट गजानन क्षीरसागर, प्रदेश महासचिव पंकज खरात, प्रदेश संघटक विशाल इंगळे, प्रदेश उपाध्यक्ष ॲड ज्योत्स्ना भिवसणे, प्रदेश सांस्कृतिक विभाग प्रमुख ॲडवोकेट संजय घाघरे,प्रदेश कार्यालयीन सचिव विशाल गढवे,प्रदेश प्रसिद्धी प्रमुख सागर वाघमारे, प्रदेश महासचिव अशोक कांबळे, यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading