Saturday, June 13, 2026
BusinessLatest News

व्ही २१ ग्रुपच्या पुणे शाखेचे उद्घाटन देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संप्पन

पुणे : व्ही २१ (V२१) ग्रुपची कार्यालये पुणे, मुंबई, बंगळुरू, गुडगाव आणि बडोदा येथे असुन आज त्यांच्या बाणेर येथील विस्तीर्ण नवीन कार्यालयाचे उद्घाटन महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संप्पन झाले.

व्ही २१ ने त्यांचा व्यवसाय विविध विभागांमध्ये वाढवला आहे आणि त्यात विविधता आणली आहे. कंपनीने अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पुरस्कार जिंकून उत्कृष्ट बेंचमार्क प्रस्थापित केले आहेत आणि स्थापनेच्या 3 वर्षांत रु. १५० कोटींहून अधिक ऑर्डर बुकचा टप्पा ओलांडला आहे आणि आता १००० कोटींचा बिझनेस क्लब गाठण्याचे त्यांचे लक्ष्य आहे.

 उद्घाटन प्रसंगी बोलताना कृष्णा पंड्या हे संस्थापक आणि सीईओ व्ही २१ ग्रुप, सह-संस्थापक रवींद्र भेगडे, युवराज मणिकम, अजय थोटे, पराग मेहता, रंजन बिस्वास आणि गौरव चौहान यांच्या उपस्थितीत म्हणाले, “बाणेर येथे आमच्या नवीन कार्यालयाचे उद्घाटन झाल्यामुळे आम्हाला खूप आनंद होत आहे. आपले माजी मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते उद्घाटन होणे ही सन्मानाची बाब आहे. आम्ही १ कर्मचार्‍यांसह सुरुवात केली आहे आणि ३ वर्षांच्या अल्प कालावधीत व्ही २१ ग्रुप अंतर्गत आमचे भारतातील ५ ठिकाणी आणि ७ कंपन्यांमध्ये १५० हून अधिक कर्मचारी आहेत. आम्ही योग्य मार्गावर वाटचाल करत आहोत आणि १००० करोड बिझनेस क्लबमध्ये सामील होण्याचा विचार करत आहोत यासाठी आमची संपूर्ण टीम कठोर परिश्रम घेत आहे आणि समर्पणाने कार्यरत आहे.

व्ही २१ ग्रुपचे संस्थापक आणि सीईओ कृष्णा पंड्या आणि त्यांचे सह-संस्थापक रवींद्र भेगडे, युवराज मणिकम, अजय थोटे, पराग मेहता, रंजन बिस्वास, गौरव चौहान यांच्या नेतृत्वाखालील पुणे, मुंबई, बंगळुरू, गुडगाव आणि बडोदा या सर्व कार्यालयांचे नेतुत्व केले जाते.

” व्ही २१ ग्रुप द्वारे प्रदान केलेल्या सेवा म्हणजे रिअल इस्टेट, सेल्स आणि मार्केटिंग कन्सलटन्सी, रिअल-इस्टेट प्रकल्पांसाठी जेव्ही/जेडी/डीएम स्टक्चर्स, प्रकल्प निधी आणि वित्त, रेसीडेंशीयल, व्यावसायिक आणि औद्योगिक बांधकाम आणि पायाभूत सुविधा, कॉर्पोरेट, कार्पोरेट आणि कमर्शियल इंटिरीयर फिट-आउट, एग्रीकल्चर आणि कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, एआर/व्हीआर/एमआर आणि व्हर्च्युअल नेक्स्ट जेन टेक्नॉलॉजीज आणि हेल्थकेअर उत्पादने.जागतिक दिग्गजांसाठी सहयोगाने काम करण्याचे भाग्य आम्हाला लाभले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading