Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

विद्यार्थ्यांना ऑनलाईन – ऑफलाईन दोन्ही पर्याय देण्यात यावे – अभाविप

पुणे:ओमिक्रॉन विषाणू चे वाढते संक्रमण, एसटी कर्मचाऱ्यांचा संप, अशा विविध अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. या परिस्थिती कडे लक्ष देता, अखिल भारतीय विद्यार्थी परिषद, पुणे महानगराच्या वतीने विद्यार्थ्यांच्या अडथळ्यांवर निष्कर्ष काढण्यासाठी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात निवेदन देण्यात आले.

कोरोनाचा प्रादूर्भाव कमी झाल्यानंतर अनेक ठिकाणी महाविद्यालय सुरू करण्यात आली आणि ऑफलाईन शिक्षण पद्धत सुरू झाली. तसेच, चालू सत्रातील परिक्षा ऑफलाईन घेतल्या जातील, अशी भूमिका विद्यापीठाने घेतली आहे. परंतु, राज्यात चाललेला एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे विद्यार्थ्यांना परिक्षा केंद्रावर जाण्यासाठीचे साधन उपलब्ध नाही, समाजकल्याण वस्तीगृह, महाविद्यालय वस्तीगृह अजूनही बंद असल्याने विद्यार्थ्यांची राहायची व्यवस्था नाही, अशा अनेक अडथळ्यांना विद्यार्थ्यांना सामोरे जावे लागत आहे. त्यातच, ओमिक्रॉन विषाणू देखील वर डोके काढताना दिसत आहे. या सर्व परिस्थिती कडे विशेष लक्ष देऊन, विद्यापीठाने विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही आणि कोरोना वाढण्यास कारण मिळणार नाही असा निर्णय घेण्याची विनंती अभाविप ने केली.

ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पर्याय उपलब्ध असल्यास विद्यार्थी आपल्या सोयीप्रमाणे ऑनलाईन किंवा ऑफलाईन परिक्षा पद्धतीची निवड करून परिक्षा देतील, आणि त्यांचे शैक्षणिक नुकसान होणार नाही. अभाविप पुणे महानगर मंत्री शुभंकर बाचल यांनी अशा प्रकारचे निवेदन आज दिनांक ०७ डिसेंबर रोजी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील कुलगुरूंना दिले.

Leave a Reply