Friday, May 29, 2026
Latest NewsPUNE

पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबर अखेर पुण्यात

पुणे : पुढील वर्षी म्हणजेच 2022 मध्ये पुणे महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी डिसेंबर अखेर पुण्यात येत आहेत.या दौऱ्यामध्ये पंतप्रधानांच्या हस्ते पुणे मेट्रोचे उद्घघाटन आणि हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रोचे भूमिपूजन होणार आहे.

महानगर प्राधिकरणाकडून या सोहळ्याची तयारी करण्यात येत आहे. त्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हेही हजेरी लावणार आहेत. डिसेंबरअखेरीस हा सोहळा करण्याचे नियोजन प्रशासन करीत आहे. हिंजवडी ते शिवाजीनगर या 23 किलोमीटरच्या मेट्रोचे काम आहे. या कामांचे नियोजन पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने पीएमआरडीएके ले आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading