भारतीय हवाई दलाच्या हेलिकॉप्टर अपघातात सीडीएस जनरल बिपीन रावत यांचे निधन
तामिळनाडू : भारताचे पहिले सीडीएस जनरल बिपीन रावत (CDS Bipin Rawat) यांचे भारतीय हवाई दलाच्या (IAF MI 17) हेलिकॉप्टरला झालेल्या अपघातात निधन झाले आहे. दुर्दैवाने या घटनेत बिपीन रावत यांच्या पत्नी मधूलिका रावत यांच्यासह 13 लष्करी अधिकाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. उदया ( 9 डिसेंबर) दिल्ली येथे या सर्वांचे पार्थिव आणण्यात येणार असून संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
आज ( 8 डिसेंबर) दुपारी 12 वा. 45 मी. तामिळनाडू मधील कुंंन्नूर येथे हवाईदलाच्या हेलिकॉप्टरचा भीषण अपघात झाला. या हेलिकॉप्टरमध्ये लष्कराचे एकूण 14 जण होते, त्यापैकी 13 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेने दिली आहे. यामध्ये संरक्षण दलाचे प्रमुख जनरल बिपीन रावत हे त्यांच्या पत्नीसह या हेलिकॉप्टरमधून प्रवास करत होते. हेलिकॉप्टरचा अपघात नेमका कसा झाला? याबाबत माहिती अद्याप समोर आलेली नाही. मात्र, अपघात इतका भीषण होता की यातील प्रवाश्यांना अत्यंत गंभीर अवस्थेत बाहेर काढण्यात आले होते.
या घटनेनंतर अनेकांनी शोक व्यक्त केला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देखील ट्वीट करत रावत यांची सेवा भारत कधीच विसरणार नाही असं म्हटलं आहे.
As India’s first CDS, Gen Rawat worked on diverse aspects relating to our armed forces including defence reforms. He brought with him a rich experience of serving in the Army. India will never forget his exceptional service.
— Narendra Modi (@narendramodi) December 8, 2021
