रेडक्लिफ लॅबने मुंबईत रिजनल रेफरेंस लॅब सुरू केली
मुंबई : रेडक्लिफ लॅबने नुकतीच मुंबईत आपली भव्य अशी रिजनल रेफरेंस लॅब सुरू केली आहे. ही नवीन लॅब अंधेरी पूर्व येथे स्थित आहे. तसेच ही लॅब ५००० चौरस फूट एवढ्या विस्तरण जागेवर उभी आहे. या नवीन लॅबमध्ये ३५०० प्रकारच्या चाचण्या केल्या जाऊ शकतात. तसेच या लॅबमध्ये दररोज सुमारे २००० सॅम्पल प्रोसेसस केले जाऊ शकतात. कोविड १९ मुळे वैद्यकीय चाचण्यांना विशेषता घरगुती निदानाची मागणी वाढली आहे. शिवाय लोक हे आता वैद्यकीय चाचण्यांनासाठी अचूकता व विश्वासार्हता शोधत आहेत.
यामुळेच रेडक्लिफ लॅबने मुंबईत त्यांची नवीन लॅब सुरू केली आहे. ही लॅब ग्राहकांना जलद परिणामांसह ऑनलाइन, ऑन-डिमांड डोअरस्टेप आरोग्य तपासणी सेवा प्रदान करेल. यावेळी रेडक्लिफ लॅबचे संस्थापक धीरज जैन म्हणाले की, जागतिक दर्जाच्या निदान चाचण्या या प्रत्येकासाठी त्यांच्या सोयीनुसार व परवडणाऱ्या किमतीत उपलब्ध करून देण्याच्या ही आमची योजना आहे. या योजनेच्या दिशेने आमची मुंबईतील रिजनल रेफरेंस लॅब हे एक महत्त्वाचे पाऊल आहे. मुंबईतील रेडक्लिफची नवीन लॅब शहरातील आणि आसपासच्या भागातील लोकांना एकाच छताखाली विविध चाचण्या करण्याची सुविधा देईल.
