Saturday, October 31, 2026
Latest NewsPUNE

डेहराडूनच्या शिष्टमंडळाची पुणे महापालिकेस सदिच्छा भेट

पुणे :  उत्तराखंड राज्याची राजधानी व राज्यातील सर्वात मोठे शहर डेहराडूनचे  महापौर सुनिल उनियाल गामा व डेहराडूनच्या शिष्टमंडळाने पुणे महानगरपालिकेत पुणे अभ्यास दौरा निमित्त सदिच्छा भेट दिली. या भेटी संदर्भात त्यांचे स्वागत, चहापाणी, पुणे शहराची माहिती व कार्यक्रमाचे अध्यक्षपद पुण्यनगरी च्या उपमहापौर सुनिता वाडेकर यांनी भूषवले. या प्रसंगी .खजन दास (विधायक : निर्वाचन क्षेत्र राजापूर रोड) , कृष्ण कुमार मिश्रा ॲडिशनल सी. ई. ओ डेहराडून स्मार्ट सिटी रमेश मिश्रा,तनुज कंभोज, नेहा डोभाल, प्रसून गर्ग, प्रेरणा ध्यानी, वर्तिका ध्यानी, आशिष सक्सेना, गणेश पांडेय (सर्व डेहराडून स्मार्ट सिटी अधिकारी) तसेच . कुणाल खेमनार, (अतिरीक्त महापालिका आयुक्त (ई)), ज्ञानेश्वर मोळक, (अतिरीक्त महापालिका आयुक्त (वि) पुणे महानगरपालिका) व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply