गुरुवारी पुणे शहरातील काही भागाचा पाणी पुरवठा बंद राहणार
पुणे :पुणे शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या लष्कर जलकेंद्र व वडगाव जलकेंद्र अखत्यारीतील रामटेकडी टाकीवरील विद्युत, पंपींग आणि स्थापत्य विषयक देखभाल व दुरुस्तीचे कामे केली जाणार आहेत. यामुळे येत्या गुरुवारी (दि.09) रोजी पुणे शहरातील काही भागाचा पूर्ण दिवसाचा पाणी पुरवठा बंद राहणार आहे. तसेच शुक्रवारी (दि.10) शहरात सकाळी उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाचे मुख्य अभियंता अनिरुद्ध पावसकर यांनी कळवले आहे.
गुरुवारी या भागाचा पाणी पुरवठा राहणार बंद
वडगाव जलकेंद्र परिसर – सिंहगड रोड वरील हिंगणे, आनंदनगर, वडगाव, धायरी, आंबेगाव पठार, दत्तनगर, धनकवडी, कात्रज, भारती विद्यापीठ परिसर, कोंढवा बुद्रुक.
रामटेकडी टाकीवरील परिसर – हडपसर, काळेपडळ, महंमदवाडी, सय्यदनगर, गोंधळेनगर, बी.टी. कवडे रोड, सातववाडी, आकाशवाणी
