Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

रमणबागेला ७५ लाख रुपयांची देणगी

पुणे : डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या रमणबाग प्रशालेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त प्रशालेचे माजी विद्यार्थी आणि प्राज इंडस्ट्रीजचे संस्थापक डॉ. प्रमोद चौधरी यांनी ७५ लाख रुपयांची देणगी दिली. शाळेच्या १९६५ च्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात धनादेश सुपूर्द करण्यात आला.

यापूर्वी चौधरी यांनी प्रशालेला पन्नास लाख रुपयांची देणगी दिली होती. त्याचा विनियोग करून विद्यार्थ्यांसाठी पथदर्शक उपक्रम सुरू करण्यात आले आहेत. शाला समितीचे अध्यक्ष अड अशोक पलांडे, प्रबंधक डॉ. सविता केळकर, मुख्याध्यापक सुनील शिवले, उपमुख्याध्यापिका अर्चना पंच, पर्यवेक्षक्‍ दीलीप रावडे, सुरेश वरगंटीवार यांची प्रमुख उपस्थिती होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading