Saturday, May 30, 2026
Latest NewsPUNE

महापालिकेतील शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत ते शून्य करणे हेच भाजपचे लक्ष – केंद्रीय मंत्री नारायण राणे

पुणे : भाजप व शिवसेनेचाअजून काही वाद संपता संपेना आता महानगरपालिकेच्या निवडणुका या जवळ आल्या आहेत. महानगरपालिका निवडणुकीत कोण जिंकणार याची चर्चा सुरू आहे त्यावर पुणे महापालिकेत शिवसेनेचे 10 नगरसेवक आहेत. ते शून्य करणे भाजपचे लक्ष आहे, असे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज सांगितले.

आगामी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज भाजपची बैठक झाली. यावेळी देवेंद्र फडणवीस , नारायण राणे व चंद्रकांत पाटील ांच्या नेतृत्वाखाली महानगरपालिका निवडणुकी मध्ये रणरीती कशी ठरवायची यावर चर्चा झाली. त्यानंतर राणे पत्रकारांशी संवाद साधला.

संजय रावते भाजपला येणाऱ्या महानगरपालिका निवडणुकीत आम्ही पराभूत करू, असे संजय राऊत सारखे म्हणत असतात त्यावर नारायण राणे म्हणाले, संजय राऊत काहीही बोलतात महापालिकेत 10 नगरसेवक आहेत. उगाचच काही बोलतात फुगे फुगवायचे अन राऊत फुगे फोडतात. अशी टीका नारायण राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

भाजप आणि शिवसेनेची युती तुटली आहे दोन दिवसापूर्वी ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांची भेट झाली त्यामुळे राज्यात युपीए बरोबर शिवसेना जाणार आहे, अशी चर्चा सुरू झाली त्यावर नारायण राणे म्हणाले ,शिवसेना यूपीएमध्ये जाणार असेल तर सत्तेसाठी गद्दारी केली. त्यांनी हिंदुत्व सोडल आहे, अशी बोचरी टीका शिवसेनेवर नारायण राणे यांच्यावर केली.

भाजप मधले काही नेते पक्ष सोडून जाणार असल्याची चर्चा आहे त्यावर नारायण राणे म्हणाले, आमच्यातून कोणी जाणार नाही. आमची सेफ बोट आहे इथून निघते थेट दिल्लीत जाते,त्यामुळे कोणी पक्ष सोडणार नाही, असे राणे म्हणाले.

आज पुण्यात भाजप तर्फे अभियान ठेवण्यात आल,हे अभियान भविष्यात येणाऱ्या महापालिका निवडणुकीत कस कोणत्या स्वरूपात काम करावं.माननीय पंतप्रधान, नगरसेवक यांनी केलेलं काम लोकांपर्यंत पोहचवावी यांसाठी हे अभियान होत, त्यासाठी मार्गदर्शन केलं आहे, असे नारायण राणे म्हणाले.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading