आंदोलन ‘जनशक्ती’चे; फाल्तुक प्रसिद्धी मात्र ‘राष्ट्रवादी’ची
करमाळा : केतुर-पारेवाडी येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये मयत झालेले नागनाथ पतुले यांच्या नावे 4 लाख 22 हजार रुपये ठेव रक्कम आहे. ही रक्कम प्रामुख्याने बँकेमध्ये खातं काढताना ज्याचे नाव वारस म्हणून लिहिले आहे. त्यांना मिळणे प्राधान्यक्रम आहे. परंतु केतुर-पारेवाडी येथील डीसीसी बँकेमधील शाखाधिकारी दिलीप गोरे यांनी मयत नागनाथ पतुले यांच्या वारसाला पैसे देण्यासाठी सात महिने टाळाटाळ करत पण तुले कुटुंबियांना जाणीवपूर्वक त्रास दिला. या अन्यायाच्या विरोधात जनशक्ती संघटनेचे संस्थापक अतुल खूपसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलनाला सुरुवात केली. या आंदोलनाला अनेक पक्ष व संघटनांनी पाठिंबा दिला. वैयक्तिकरित्या अनेकांनी भेटून मार्गदर्शन केले. मात्र हनुमंत मांढरे नावाचा राष्ट्रवादीचा भामटा कार्यकर्ता आंदोलनस्थळी येऊन फोटोसेशन करून गेला. भले ही चार – दोन फोन लावले असतील. मात्र फोटोसेशन करत प्रसिद्धी करून न्याय मिळवून दिल्याचा रुबाब तालुक्यात करत आहे. ‘लगीन लोकाचं नाचतय येड्या भोकाचा’ या म्हणी प्रमाणे हा भामटा कार्यकर्ता ‘बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना’ न बोलताच लग्नात आला वरून प्रसिद्धीचा तोरा मिळवत आहे. याने जनशक्ती संघटना व अतुल भाऊ बाबत तोंड सांभाळून बोलावे अन्यथा मस्ती जिरवायला उशीर लागणार नाही अशा शब्दात जनशक्ती च्या महिला नेत्या तथा आंदोलक दिपाली डेरी यांनी समाचार घेतला.
याबाबत अधिक माहिती अशी की, केतुर येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे शाखाधिकारी गोरे हे पतुले कुटुंबाला जाणीवपूर्वक त्रास देत होते. मयत नागनाथ पतुले यांच्या पैशासाठी वारस असलेल्या त्यांच्या पत्नी गुणाबाई पतुले ह्या त्यांच्या सात मुलींसह मंगळवार दि. 30 नोव्हेंबर 2021 पासून तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये आमरण उपोषणासाठी बसलो होतो. या आंदोलनासाठी जनशक्ती चे संस्थापक अतुल खूपसे पाटील वारंवार सूचना आणि मार्गदर्शन करत होते. शिवाय वरिष्ठांना फोनवरून संपर्क देखील साधत होते.
या आंदोलनादरम्यान अनेक पक्षातील अनेक कार्यकर्त्यांनी भेट देऊन पाठिंबा दर्शविला. शिवाय या बाबत मार्गदर्शन देखील केले. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसचा हनुमंत मांढरे नावाचा बाजारू व भामटा कार्यकर्ता आंदोलनाला पाठिंबा दर्शवण्यासाठी आला व फोटोसेशन केला. मात्र पुढे जाऊन त्याने वेगळ्याच अफवा पसरविल्या. त्यामुळे संतापलेल्या दीपाली ढेरे यांनी मांढरे याचा खरपूस शब्दात समाचार घेतला.
दरम्यान, जनशक्ती च्या महिला नेत्या दिपाली डेरे यांना ज्यावेळी ही बाब समजली त्यावेळी त्यांनी हनुमंत मांढरे नावाच्या कार्यकर्त्याला अनेक वेळा फोन केला. मात्र घाबरलेल्या मांढरे याने फोन घेतला नाही.
