Tuesday, June 16, 2026
Latest NewsPUNE

सिंहगड रोड उड्डाणपूल ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणत काम रेटून नेण्याचा महापालिकेचा खटाटोप

पुणे : मोठा गाजावाजा करत सिंहगड रोडवरील उड्डाण पुलाचे भूमिपूजन झाले. रस्ते आणि वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते पुलाचे भूमिपूजन झाले. त्या वेळी त्यांनी पूल दुमजली करण्याचा सल्ला महापालिकेस दिला.  दरम्यान, नागरिकांमधून पर्यायी रस्ते आधी करा, मग उड्डाण पुलाचे काम करा, असा रेटा आहे. अर्थात याकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे.  विकास आराखड्यातील या पर्यायी रस्त्यांच्या कामांकडे दुर्लक्ष करत ‘ड्रीम प्रोजेक्ट’ म्हणत उड्डाण पुलाचे काम रेटून नेण्याचा महापालिकेचा खटाटोप वाखाणण्याजोगा आहे.  या पर्यायी रस्त्यांची कामे आधी पूर्ण करून नंतर प्रस्तावित उड्डाण पुलाचे काम सुरू केल्यास मुख्य सिंहगड रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी होण्यास आणि वाहतुकीचा ताण कमी होणार आहे.

सिंहगड रस्त्यासाठी असणारे आणि विकास आराखड्यात नमूद केलेले पर्यायी रस्ते केवळ कागदावरच राहिले असून. नागरिकांना मात्र वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत आहे. यातून नागरिकांच्या वेळेचा, इंधनाचा अपव्यय तर होतोच. परंतु सर्वाधिक म्हणजे मानसिक त्रास सहन करावा लागत आहे. असे असतानादेखील प्रशासनाने मात्र याकडे पूर्णपणे डोळेझाक करत महापालिकेने सिंहगड रस्त्याला उड्डाण पुल करण्याचा निर्णय घेतला आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading