राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांच्या मुदत वाढी संदर्भात मुख्यमंञांशी बोलणार – उपमुख्यमंत्री अजित पवार
पुणे :राज्याचे मुख्य सचिव सिताराम कुंटे यांचा मुख्य सचिव पदाचा कार्यकाल संपत आला आहे .त्यांचा तीन महिने मुदतवाढिचा मुख्यमंत्र्यांनी वाढवून द्यावा अशी मागणी केली होती . त्यावर मुदतवाढ यांचा मुदतवाढीचा प्रस्ताव केंद्राने का नाकारला हे तपासून पाहावं लागेल.कारण यापूर्वीच्या मुख्य सचिवांना दोनदा मुदतवाढ मिळाली होती. मी यासंदर्भात मुख्यमंञांशी बोलूनच अधिकचं भाष्य करेन. असे उपमुख्यमंत्री व पुण्याचे पालकमंत्री अजित पवार हे पुण्यात एका कार्यक्रमाला आले असता त्यांनी याबाबत पत्रकारांनी माहिती दिली.
पुण्यातल्या शाळा उद्यापासून सुरू होणार होत्या .पण ओमायक्रॉनचा धोका नेमका किती संभवतो याचा अंदाज येत नसल्याने .15 तारखेपर्यंत शाळा उघडण्याचा लांबणीवर टाकावा लागलाय. तसंच दक्षिण आफ्रिकेतून आलेल्या 1 हजार प्रवाशांचंही ट्रेसिंग सुरू आहे. असे अजित पवार म्हणाले. रुग्ण संख्या वाढू लागल्यानेच .निर्बंध पुन्हा कडक करावे लागले, पुणेकरांनीच उगीच गैरसमज करून घेऊ नये. असे अजित पवार म्हणाले.
