Saturday, June 20, 2026
Latest NewsPUNE

एच. सी. एम. टी. आरच्या मार्गाचे ६४ कोटी रुपये वर्गीकरणाचा निधी आरोग्यासाठी स्वतंत्र रित्या राखून ठेवला

पुणे : भाजपा व्यतरिक्त ६४ नगरसेवकांना एच सी एम टी आर च्या मार्गाचे ६४ कोटी रुपये वर्गीकरण करून महापालिकेच्या मुख्य सभेने दिले असले तरी असा निधी आता ‘ओमिक्रॉन’च्या धडकेमुळे वितरीत करणे योग्य होणार नाही; असा पवित्रा घेत पुणे महापालिका आयुक्तांनी हा निधी आरोग्यासाठी स्वतंत्र रित्या राखून ठेवावा असा निर्णय घेतला आहे .

या शिवाय प्रत्येकी ५ लाखाची बाकडे आणि ५ लाखाच्या पिशव्या याबाबत देखील फेर विचार करावा लागेल असा निर्णय हि आयुक विक्रम कुमार यांनी घेतला असल्याची माहिती येथे सूत्रांनी दिली. जम्बो हॉस्पिटला महत्व देणे, रुग्णांचा शोध घेणे, डोस देणे यावरच महापालिकेला भर द्यावा लागेल आणि प्रसंगी ६७ (३) क वापरून यासाठी खर्च करावा लागेल, असे प्रशासनाचे म्हणणे आहे.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading