Saturday, May 2, 2026
Latest NewsMAHARASHTRATOP NEWS

महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारांना ‘या’ तारखे पर्यंत सादर करता येणार जात वैधता प्रमाणपत्र

मुंबई : कोवीड-19 मुळे प्रशासकीय आव्हाने व अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत पडताळणी समित्यांकडून केवळ जात वैधता प्रमाणपत्र वेळेत न दिल्यामुळे उमेदवारांना, राखीव असलेल्या पदांसाठी निवडणुक लढविण्याच्या संधीपासुन वंचित रहावे लागू नये; यासाठी जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची मुदत 31 डिसेंबर 2022 पर्यंत वाढविण्यात आली आहे.  आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षस्थानी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. या संदर्भातील अध्यादेश लवकरच राज्यपालांच्या मान्यतेनंतर काढण्यात येईल.

मुंबई महानगरपालिका अधिनियम 1888, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, 1965 मध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती किंवा यथास्थिती, नागरिकांचा मागास प्रवर्ग यांच्याकरीता राखीव असलेल्या जागेसाठी निवडणुक लढविण्यास इच्छुक असलेल्या प्रत्येक व्यक्तीने नामनिर्देशन पत्राबरोबर, सक्षम प्राधिकाऱ्याने निर्गमित केलेले जात प्रमाणपत्र व पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करणे करण्याची तरतूद आहे.

मात्र, जात पडताळणी समित्यांकडील कामाच्या भारामुळे केवळ वेळेत जात वैधता प्रमाणपत्र न मिळाल्यामुळे, उमेदवारांना राखीव पदांसाठी निवडणूक लढविण्याच्या संधीपासून वंचित रहावे लागू नये; यासाठी महानगरपालिका/नगरपरिषदांच्या सार्वत्रिक/ पोटनिवडणूकीसाठी नामनिर्देशनपत्र भरताना संबंधित उमेदवारांना वैधता प्रमाणपत्र सादर करण्याची 12 महिन्यांची मुदत हमीपत्रावर देणे, अशी तरतूद करण्यात आली होती.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading