पक्ष संघटन बैठकीवर चर्चा करायला अमित शहा यांची भेट – देवेंद्र फडणवीस
पुणे: भाजपचे प्रदेशाध्यक्ष व आमदार चंद्रकांत पाटील व विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस हे काल केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीसाठी दिल्लीला गेले होते . त्यामुळे राज्यात वेगवेगळ्या चर्चांना आल त्यावर आम्ही पक्षाची संघटना बैठक वर चर्चा करायला दिल्लीला आम्ही अमित शहा यांची भेट घ्यायला गेलो होतो. अशी माहिती विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी दिली.
स्वर्गीय शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या कुटुंबाचे सात्वन केल्या नंतर पत्रकारांशी ते बोलत होते.
देवेंद्र फडणविस म्हणाले, या सरकारचे गेल्या दोन वर्षात काय काय काम केले याचा सरकारने अहवाल द्यावा असे फडणवीस म्हणाले.
दररोज भाजपच्या पत्रकार परिषदा या महाविकास आघाडी सरकारने जनतेची फसवणूक केल्याबद्दल
होत आहेत त्यावर फडणवीस म्हणाले,सरकारच्या
कामगिरीचे काही मूल्यमापन नाही. म्हणून या पत्रकार परिषद रोज घ्याव्या लागत आहे. असे देवेंद्र फडणवीस म्हणाले.
शिवसृष्टी स्मारकाचा वाद अजूनही प्रलंबित आहे केंद्र सरकार म्हणते राज्य सरकारचे हे बांधून देणे हे काम आहे. राज्यसरकारने मदत केली पाहिजे असे फडणवीस म्हणाले.
