Saturday, May 2, 2026
Latest NewsSports

गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीतच खबळजनक निकालाची नोंद 

पुणे : डेक्कन जिमखाना यांच्या तर्फे आयोजित व आयटीएफ, महाराष्ट्र राज्य लॉन टेनिस संघटना(एमएसएलटीए)आणि पुणे मेट्रोपोलिटन जिल्हा टेनिस संघटना(पीएमडीटीए)यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या गद्रे मरीन-एमएसएलटीए आयटीएफ ग्रेड 3 कुमार 18 वर्षाखालील टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत पात्रता फेरीच्या पहिल्या चरणात जय दिक्षीत, किर्थिव सुरेश या खेळाडूंनी मानांकित खेळाडूंवर विजय मिळवत आजचा दिवस गाजवला.

डेक्कन जिमखाना टेनिस कोर्ट,येथे आजपासून सुरु झालेल्या या स्पर्धेत पहिल्या पात्रता फेरीत मुलांच्या गटात बिगरमानांकीत किर्थिव सुरेश याने चौथ्या मानांकित धनुष पटेलचा 6-3, 6-1 असा पराभव करून सनसनाटी निकालाची नोंद केली. चुरशीच्या झालेल्या लढतीत जय दिक्षित याने पाचव्या मानांकित प्रणव कार्तिकचा टायब्रेकमध्ये 7-6(4), 7-5 असा पराभव करून पात्रता फेरीच्या दुसऱ्या चरणात प्रवेश केला.

महाराष्ट्राच्या सातव्या मानांकित अर्जुन गोहडने अथर्व पाटीलचा 6-0, 6-0 असा एकतर्फी पराभव करून आगेकूच केली. दुसऱ्या मानांकित जैष्णव शिंदे याने आयान तेजाबवालाचा 6-4, 6-1 असा पराभव केला. अव्वल मानांकित भूषण होबाम याने अंशुल सातवला टायब्रेकमध्ये 7-6(5), 6-2 असे पराभूत केले. ओमर सुमारने आर्य कळंबेल्लाचा 6-1, 5-7, 12-10 असा तीन सेटमध्ये पराभव केला.

मुलींच्या गटात  कायरा चेतनानी, सामायरा मलिक, श्रीनिधी बालाजी, भूमी कक्कर, धनश्री पाटील, कशिश बोटे या खेळाडूंनी आपापल्या प्रतिस्पर्धी खेळाडूंचा पराभव करून दुसऱ्या पात्रता फेरीत प्रवेश केला.

स्पर्धेचा सविस्तर निकाल: मुले: पहिली पात्रता फेरी: 

भूषण होबाम(भारत)[1] वि.वि.अंशुल सातव(भारत) 7-6(5), 6-2;

ओमर सुमार(भारत)वि.वि.आर्य कळंबेल्ला(भारत)6-1, 5-7, 12-10;

निशित रहाणे(भारत)वि.वि.रिषी जलोटा(भारत)6-3, 6-1;

अर्जुन गोहड(भारत)[7]वि.वि.अथर्व पाटील(भारत)6-0, 6-0;

जैष्णव शिंदे(भारत[2]वि.वि.आयान तेजाबवाला(भारत)6-4, 6-1;

अर्णव पापरकर(भारत) वि.वि.सिद्धार्थ विनोद(भारत)6-3, 6-1;

शिवम कदम(भारत)वि.वि.लक्ष्य चुग(भारत)6-1, 6-4;

आकर्ष गावकर(भारत)[8] वि.वि.रक्षक विवेकानाथन(भारत)7-6(4), 7-5;

विनीत मूत्याला(भारत)वि.वि.वेद शेट्टी(भारत) 6-3, 6-3;

प्रज्वल तिवारी(भारत)वि.वि.अर्जुन अभ्यंकर(भारत)7-5, 6-2;

जय दिक्षित(भारत)वि.वि.प्रणव कार्तिक(भारत)[5]7-6(4), 7-5;

किर्थिव सुरेश(भारत)वि.वि.धनुष पटेल(भारत)[4]6-3, 6-1;

तरुण कोरवार(भारत)वि.वि.आर्यन अरोरा(भारत)3-6, 6-1, 10-3;

प्रणव गाडगीळ(भारत)वि.वि.आदीथ अमरनाथ(भारत)7-6(3), 6-4;

रेथीन प्रणव सेंथीलकुमार(भारत)[6]वि.वि.तनिष्क जाधव(भारत)7-5, 7-6(6);

दिप मुनीम(भारत)[3]वि.वि.ईशान देगमवार(आर्यलंड)6-3, 6-3;

मुली:

कायरा चेतनानी(भारत)वि.वि.भक्ती ताजणे(भारत)6-2, 6-2;

सामायरा मलिक(भारत)वि.वि.सोहा पाटील(भारत)6-0, 6-0;

श्रीनिधी बालाजी(भारत)वि.वि.रिया कौशिक(भारत)7-6(3), 6-1;

भूमी कक्कर(भारत)वि.वि.श्रीया साई रुजे(भारत)6-0, 6-1;

धनश्री पाटील(भारत)वि.वि.इशिका चौधरी(भारत)6-3, 6-0;

कशिश बोटे(भारत) वि.वि.कौशिकी समंता(भारत)6-3, 6-0.

Leave a Reply

Discover more from Maharashtra Lokmanch

Subscribe now to keep reading and get access to the full archive.

Continue reading